Android app on Google Play

 

मुंबईला 1

रंगाचें एक वर्ष फुकट गेलें. परंतु प्रकृति चांगली झाली. मॅट्रिक होऊन तो मुंबईस चित्रकलेचें शिक्षण घ्यायला गेला. तीनचार विद्यार्थी मिळून त्यांनी एका चाळींत एक जागा घेतली होती. लहान लहान दोन खोल्या होत्या. इतर विद्यार्थी खानावळींत जात. परंतु रंगा हातानेंच स्वयंपाक करी. खानावळींचे अन्न त्याला आवडत नसे. शिवाय खर्च कमी यावा म्हणूनहि तो जपे. वासुकाकांवर बोजा घालायचा तरी किती असें त्याच्या मनांत येई.

रंगा चित्रकार होता, कलावान् होता. परंतु त्याची कला केवळ कागदी नव्हती. सर्व जीवनांतच तो कला आणी. खोली कशी स्वच्छ ठेवी. इतर विद्यार्थी सारें अस्ताव्यस्त टाकून जायचे. रंगा तें सारें नीट लावून ठेवायचा. तो जितक्या आवडीनें चित्र रंगवी, तितक्याच आवडीनें केर काढी, मोरी घांशी, कपबश्या स्वच्छ विसुळी. तो भांडी लख्ख ठेवी. त्याचा स्वयंपाक स्वच्छ, सुटसुटीत असे. साधी पोळींच परंतु तो किती सुंदर भाजी. बटाटे चिरणें असो. तो तुकडे कलात्मक कापी. रंगा अन्तर्बाह्य कलावान् होता. त्याची दृष्टि सर्वत्र सौंदर्य बघे, आणि सर्वत्र तें निर्मी.

एक दोन वर्षे गेलीं. रंगा आतां चित्रकलेच्या तिसर्‍या वर्षाला होता. तो घरांत रंगवित असे. शेजारची लिली त्याच्या खोलींत यायची. रंगाला तिचें वेड. दोन तीन वर्षांची मुलगी. रंगा रंगा करित यायची. रंगा तिला चित्रें द्यायचा; तिला स्टुलावर बसवून तिचें चित्र काढायचा.

''ओहो माझें चित्र, आई हें बघ माझें चित्र.''
''तूं भाऊला त्रास नको देऊं. काल त्याचे रंग सांडलेस ना ?''           

''मी चित्र काढित होतें. रंगा माझें चित्र काढतो, मी त्याचें काढीन. आपण रंगाचें चित्र येथें टांगूं हा आई.''

''लिले, रंगा रंगा नाहीं म्हणायचें. काय म्हणायचें ? भाऊ. भाऊ म्हणत जा हो.''
''आई, रंगा तुझा भाऊ ?''
''हो''
''म्हणजे माझे कोण ?''
''मामा''
''मग मी मामा म्हणून हांक मारुं ?''
''भाऊच हांक गोड आहे.''
''मी रंगालाच विचारींन कीं भाऊ म्हणूं की मामा म्हणूं तें.''

चित्रकार रंगा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बाल्य 1
बाल्य 2
बाल्य 3
बाल्य 4
बाल्य 5
बाल्य 6
मामाकडे 1
मामाकडे 2
मामाकडे 3
मामाकडे 4
मामाकडे 5
मामाकडे 6
आधार मिळाला 1
आधार मिळाला 2
आधार मिळाला 3
आधार मिळाला 4
आधार मिळाला 5
आधार मिळाला 6
आधार मिळाला 7
ताटातूट 1
ताटातूट 2
ताटातूट 3
ताटातूट 4
ताटातूट 5
ताटातूट 6
ताटातूट 7
ताटातूट 8
*आई गेली 1
*आई गेली 2
*आई गेली 3
*आई गेली 4
*आई गेली 5
*आई गेली 6
*आई गेली 7
रंगाचें आजारीपण 1
रंगाचें आजारीपण 2
रंगाचें आजारीपण 3
रंगाचें आजारीपण 4
रंगाचें आजारीपण 5
मुंबईला 1
मुंबईला 2
मुंबईला 3
मुंबईला 4
मुंबईला 5
मुंबईला 6
नवीन अनुभव 1
नवीन अनुभव 2
नवीन अनुभव 3
नवीन अनुभव 4
नवीन अनुभव 5
नवीन अनुभव 6
नंदलालांच्याजवळ 1
नंदलालांच्याजवळ 2
नंदलालांच्याजवळ 3
नंदलालांच्याजवळ 4
नंदलालांच्याजवळ 5
निष्ठुर दैव 1
निष्ठुर दैव 2
निष्ठुर दैव 3
निष्ठुर दैव 4
निष्ठुर दैव 5
मित्राचें पत्र 1
मित्राचें पत्र 2
मित्राचें पत्र 3
मित्राचें पत्र 4
मित्राचें पत्र 5
सुनंदाची तपश्चर्या 1
सुनंदाची तपश्चर्या 2
सुनंदाची तपश्चर्या 3
सुनंदाची तपश्चर्या 4
सुनंदाची तपश्चर्या 5
मुंबईस 1
मुंबईस 2
मुंबईस 3
मुंबईस 4
मुंबईस 5
मुंबईस 6
मुंबईस 7
मुंबईस 8
मुंबईस 9
मुंबईस 10
ताईची भेट 1
ताईची भेट 2
ताईची भेट 3
ताईची भेट 4
ताईची भेट 5
ताईची भेट 6
ताईची भेट 7
ताईची भेट 8
ताईची भेट 9
वादळ 1
वादळ 2
वादळ 3
वादळ 4
वादळ 5
भारत-चित्रकला-धाम 1
भारत-चित्रकला-धाम 2
भारत-चित्रकला-धाम 3
भारत-चित्रकला-धाम 4
भारत-चित्रकला-धाम 5
भारत-चित्रकला-धाम 6
भारत-चित्रकला-धाम 7
भारत-चित्रकला-धाम 8
भारत-चित्रकला-धाम 9
भारत-चित्रकला-धाम 10
भारत-चित्रकला-धाम 11
भारत-चित्रकला-धाम 12
भारत-चित्रकला-धाम 13
भारत-चित्रकला-धाम 14
भारत-चित्रकला-धाम 15
भारत-चित्रकला-धाम 16
भारत-चित्रकला-धाम 17
रंगाचें निधन 1
रंगाचें निधन 2
रंगाचें निधन 3
रंगाचें निधन 4
रंगाचें निधन 5
रंगाचें निधन 6
रंगाचें निधन 7
स्वातंत्र्याच्या युध्दांत 1
स्वातंत्र्याच्या युध्दांत 2
स्वातंत्र्याच्या युध्दांत 3
स्वातंत्र्याच्या युध्दांत 4
स्वातंत्र्याच्या युध्दांत 5
स्वातंत्र्याच्या युध्दांत 6
स्वातंत्र्याच्या युध्दांत 7
स्वातंत्र्याच्या युध्दांत 8
स्वातंत्र्याच्या युध्दांत 9
स्वातंत्र्याच्या युध्दांत 10
स्वातंत्र्याच्या युध्दांत 11
स्वातंत्र्याच्या युध्दांत 12
स्वातंत्र्याच्या युध्दांत 13
स्वातंत्र्याच्या युध्दांत 14
स्वातंत्र्याच्या युध्दांत 15
भारताची दिगंत कीर्ति 1
भारताची दिगंत कीर्ति 2
भारताची दिगंत कीर्ति 3
भारताची दिगंत कीर्ति 4
भारताची दिगंत कीर्ति 5