Get it on Google Play
Download on the App Store

बाल्य 1

काशीचें हे पहिलें बाळंतपण. ती माहेरीं आली होती. तिचे दिवस भरत आले होते. आईबापांचे तिच्यावर फार प्रेम होतें. तिची प्रत्येक हौस पुरविली जाई. माहेरीं श्रीमंती होती अशांतला भाग नाहीं. काशीचे वडील एका सावकाराकडे मुनीम होते. त्यांचे लहानसें घर होतें. फुलांचा त्यांना फार नाद. किती तरी फुलझाडें घराभोंवती होतीं. काशी आणि तिचा मोठा भाऊ काशिनाथ, दोघेंच भावंडें. काशिनाथ पुण्याला नुकताच नोकरीस लागला होता. मागल्या वर्षी त्याचें लग्न झालें होतें. त्याची पत्नीहि माहेरीं बाळंतपणाला गेली होती. तिचें माहेर तिकडे लांब सांगलीकडे होतें.
''काशी, दादाचें पत्र आलें आहे,''
''वैनी बाळंत झाली वाटतें?''
''हो. मुलगी झाली. देवाला गूळ ठेव जा. आणि सर्वांना दे.''
''इश्श, गूळ का वांटायचा? आई, बर्फी आणायला सांग ना ग बाबांना.''
देवाला गूळ ठेवण्यांत आला. परंतु मागून वामनरावांनी बर्फी आणून सर्वांना वांटली. सर्वांचीं तोंडें गोड झालीं.
''काशी, तुला मुलगी होणार कीं मुलगा?'' शेजारच्या रमाकाकूंनीं येऊन विचारलें.

''तिला नक्की मुलगा होणार. मान बघा कशी बारीक झाली आहे'' शेवंताताई म्हणाल्या.

काशी लाजी. ती तेथून उठून गेली. ती झोंपाळ्यावर जाऊन बसली. शिवरात्र गेली. शिमगा आला. होळी पुनवहि गेली. आज रंगपंचमीचा दिवस.

''बाबा, मला रंग आणून द्या. पिचकारी आणून द्या''
''तूं का आतां लहान रंग खेळायला? आणि दमून जाशील'' आई म्हणाली.

''मुळींच नाहीं दमणार, मी सारखी रंग खेळत राहीन. आज माझ्या हातापायांत खूप शक्ति आली आहे. बाबा, तुमच्या अंगावर रंग उडवीन, आई, तुझ्याहि. शेजारच्या शेवंताताई, रमाकाकू, सर्वांच्या अंगावर मी रंग उडवीन, जो भेटेल त्याला. गंमत रंगाचीं गाणीं म्हणूं, नाचूं. लता येईल, कुसुम येईल, गोपू येईल. मजा,''

काशीला वडिलांनी रंग आणून दिले. पिचकारीहि आणली. आणि काशी रंग खेळूं लागली. आज शेजारीपाजारीं ती सर्वत्र गेली. गडीमाणसें, मित्रमैत्रिणीं, सर्वांच्या अंगावर ती रंग उडवीत सुटली. तिच्याहि अंगावर इतरांनी वर्षाव केला. अशी रंगपंचमी त्या आळींत कधीं झाली नव्हती. सर्वांनाच जणूं स्फूर्ति आली. आणि रंग उडवित काशी नाचूं लागली. तिच्या भोंवतीं मुलेंमुली नाचत होतीं. मध्येंच रंगाची कारंजी उसळत.

चित्रकार रंगा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बाल्य 1 बाल्य 2 बाल्य 3 बाल्य 4 बाल्य 5 बाल्य 6 मामाकडे 1 मामाकडे 2 मामाकडे 3 मामाकडे 4 मामाकडे 5 मामाकडे 6 आधार मिळाला 1 आधार मिळाला 2 आधार मिळाला 3 आधार मिळाला 4 आधार मिळाला 5 आधार मिळाला 6 आधार मिळाला 7 ताटातूट 1 ताटातूट 2 ताटातूट 3 ताटातूट 4 ताटातूट 5 ताटातूट 6 ताटातूट 7 ताटातूट 8 *आई गेली 1 *आई गेली 2 *आई गेली 3 *आई गेली 4 *आई गेली 5 *आई गेली 6 *आई गेली 7 रंगाचें आजारीपण 1 रंगाचें आजारीपण 2 रंगाचें आजारीपण 3 रंगाचें आजारीपण 4 रंगाचें आजारीपण 5 मुंबईला 1 मुंबईला 2 मुंबईला 3 मुंबईला 4 मुंबईला 5 मुंबईला 6 नवीन अनुभव 1 नवीन अनुभव 2 नवीन अनुभव 3 नवीन अनुभव 4 नवीन अनुभव 5 नवीन अनुभव 6 नंदलालांच्याजवळ 1 नंदलालांच्याजवळ 2 नंदलालांच्याजवळ 3 नंदलालांच्याजवळ 4 नंदलालांच्याजवळ 5 निष्ठुर दैव 1 निष्ठुर दैव 2 निष्ठुर दैव 3 निष्ठुर दैव 4 निष्ठुर दैव 5 मित्राचें पत्र 1 मित्राचें पत्र 2 मित्राचें पत्र 3 मित्राचें पत्र 4 मित्राचें पत्र 5 सुनंदाची तपश्चर्या 1 सुनंदाची तपश्चर्या 2 सुनंदाची तपश्चर्या 3 सुनंदाची तपश्चर्या 4 सुनंदाची तपश्चर्या 5 मुंबईस 1 मुंबईस 2 मुंबईस 3 मुंबईस 4 मुंबईस 5 मुंबईस 6 मुंबईस 7 मुंबईस 8 मुंबईस 9 मुंबईस 10 ताईची भेट 1 ताईची भेट 2 ताईची भेट 3 ताईची भेट 4 ताईची भेट 5 ताईची भेट 6 ताईची भेट 7 ताईची भेट 8 ताईची भेट 9 वादळ 1 वादळ 2 वादळ 3 वादळ 4 वादळ 5 भारत-चित्रकला-धाम 1 भारत-चित्रकला-धाम 2 भारत-चित्रकला-धाम 3 भारत-चित्रकला-धाम 4 भारत-चित्रकला-धाम 5 भारत-चित्रकला-धाम 6 भारत-चित्रकला-धाम 7 भारत-चित्रकला-धाम 8 भारत-चित्रकला-धाम 9 भारत-चित्रकला-धाम 10 भारत-चित्रकला-धाम 11 भारत-चित्रकला-धाम 12 भारत-चित्रकला-धाम 13 भारत-चित्रकला-धाम 14 भारत-चित्रकला-धाम 15 भारत-चित्रकला-धाम 16 भारत-चित्रकला-धाम 17 रंगाचें निधन 1 रंगाचें निधन 2 रंगाचें निधन 3 रंगाचें निधन 4 रंगाचें निधन 5 रंगाचें निधन 6 रंगाचें निधन 7 स्वातंत्र्याच्या युध्दांत 1 स्वातंत्र्याच्या युध्दांत 2 स्वातंत्र्याच्या युध्दांत 3 स्वातंत्र्याच्या युध्दांत 4 स्वातंत्र्याच्या युध्दांत 5 स्वातंत्र्याच्या युध्दांत 6 स्वातंत्र्याच्या युध्दांत 7 स्वातंत्र्याच्या युध्दांत 8 स्वातंत्र्याच्या युध्दांत 9 स्वातंत्र्याच्या युध्दांत 10 स्वातंत्र्याच्या युध्दांत 11 स्वातंत्र्याच्या युध्दांत 12 स्वातंत्र्याच्या युध्दांत 13 स्वातंत्र्याच्या युध्दांत 14 स्वातंत्र्याच्या युध्दांत 15 भारताची दिगंत कीर्ति 1 भारताची दिगंत कीर्ति 2 भारताची दिगंत कीर्ति 3 भारताची दिगंत कीर्ति 4 भारताची दिगंत कीर्ति 5