सुत्तनिपात 189
पाली भाषेत :-
५४
[१६. सारिपुत्तसुत्तं]
९५५ न मे दिट्ठो इतो पुब्बे (इच्चायस्मा सारिपुत्तो) नस्सुतो१ उद कस्सचि। (१ नि.- न सुतो.)
एवं वग्गुवदो सत्था तुसिता गणिमागतो।।१।।
९५६ सदेवकस्स लोकस्स यथा दिस्सति चक्खुमा।
सब्बं तमं विनोदेत्वा एको व रतिमज्झगा।।२।।
५४
[१६. सारिपुत्तसुत्त]
९५५. असा गोड बोलणारा, तुषित देवलोकाहून इहलोकीं आलेला व गणाचा पुढारी (गुरु)—असें आयुष्मान् शारिपुत्र म्हणाला—मीं यापूर्वी पाहिला नाहीं, किंवा कोणाकडून ऐकला नाहीं. (१)
९५६ सर्व तमाचा नाश करून एकचरियेंत रत झालेला असा हा सदेवक जगाला एकच चक्षुष्मान् दिसत आहे. (२)
पाली भाषेत :-
९५७ तं बुद्धं असितं तादिं अकुहं गणिमागतं।
बहुन्नमिध बद्धानं अत्थि पञ्हेन आगमं।।३।।
९५८ भिक्खुनो विजिगुच्छतो भजतो रित्तमासनं।
रुक्खमूलं सुसानं वा पब्बतानं गुहासु वा।।४।।
९५९ उच्चावचेसु सयनेसु कीवन्तो१ तत्थ भेरवा। (१ नि.-खीवन्तो.)
येहि भिक्खु न वेधेय्य निग्घोसे सयनासने।।५।।
९६० कति परिस्सया लोके गच्छतो अमतं२ दिसं। (२ नि.-अगतं. )
ये भिक्खु अभिसंभवे पन्तह्मि सयनासने।।६।।
९६१ क्यास्स व्यप्पथयो अस्सु क्यास्सस्सु इध गोचरा।
कानि सीलब्बतानस्सु पहितत्तस्स भिक्खुनो।।७।।
मराठीत अनुवाद :-
९५७ अनाश्रित व अदांभिक अशा त्या बुद्धपदाला पावलेल्या गणाच्या पुढार्यापाशीं मी अनेक बद्ध माणसांच्या (हितोद्देशानें) प्रश्न विचारण्यासाठीं आलों आहे. (३)
९५८ संसाराला उबगलेल्या व झाडाखालीं, स्मशानांत, किंवा पर्वताच्या गुहांमध्यें एकान्तवास सेवन करणार्या भिक्षूला, (४)
९५९ तशा त्या बर्यावाईट जागीं भयदायक वस्तू कोणत्या कीं, ज्यांपासून तशा नि:शब्द स्थळीं भिक्षूनें घाबरतां कामा नयें? (५)
९६० अमृत दिशेला जाणार्याला जगांत विघ्नें कोणतीं कीं, जीं भिक्षूनें अरण्याच्या सीमेवर राहत असतां सहन केलीं पाहिजेत? (६)
९६१ त्या दृढबुद्धि, भिक्षूची वाणी कशी असावी? त्याचें राहणें-सवरणें कसें असावें? आणि त्याचें शील आणि व्रत कसें असावें? (७)