सुत्तनिपात 125
पाली भाषेतः-
६१९ यो हि कोचि मनुस्सेसु गामं रट्ठं च भुञ्ञति।
एवं वासेट्ठ जानाहि राजा एसो न ब्राह्मणो।।२६।।
६२० न चाहं ब्राह्मणं ब्रूमि योनिजं सत्तिसंभवं।
भोवादि नाम सो होति सचे होति सकिञ्चनो।
अकिंचनं अनादानं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।२७।।
६२१ सब्बसंयोजनं छेत्वा यो वे न परितस्सति।
संगातिगं विसंयुत्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।२८।।
६२२ छेत्वा नन्धिं१(१ सी.-नन्दिं.) वरत्तं च सन्दानं सहऽमुक्कमं।
उक्खित्तपळिघं बुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।२९।।
मराठीत अनुवाद :-
६२०. आईच्या उदरांतून जन्मणार्याला मी ब्राह्मण म्हणत नाहीं. जर त्याजपाशी संपत्ति असली, तर तो (इतर जनांस) ‘भो’ शब्दानें संबोधण्यांस१ (१ इतर लोकांशीं बोलतांना, त्यांना हांक मारतांना ‘भो’, ‘भो’ असें मोठ्या ताठ्यानें म्हणतो.) तेवढा पात्र होतो. पण जो संपत्तिविरहित व आदानविरहित, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(२७)
६२१. सर्व संयोजनें तोडून जो त्रास पावत नाहीं, जो संगाच्या पार जातो, व जो विसंयुक्त त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(२८)
६२२. नध्री (क्रोध), वरत्रा (तृष्णा) आणि (अनुशयरूपी) अनु२क्रमासहित वागुरा२ (२-२.नध्री आणि वरत्रा म्हणजे एक प्रकारच्या चामड्याच्या वाद्या, ज्यांची वागुरा करतात. अनुक्रम= क्रमप्राप्त गोष्टी.) (सांप्रदायिक बुद्धि) छेदून व अर्गला फेकून जो बुद्ध होतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(२९)
पाली भाषेतः-
६२३ अक्कोसं वधबन्धं च अदुट्ठो यो तितिक्खति।
खन्तीबलं बलानीकं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३०।।
६२४ अक्कोधनं वतवन्तं सीलवन्तं अनुस्सदं।
दन्तं अन्तिमसारीरं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३१।।
६२५ वारि पोक्खरपत्ते व आरग्गेरिव सासपो।
यो न लिप्पकि कामेसु तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३२।।
६२६ यो दुक्खस्स पजानाति इधेव खयमत्तनो।
पन्नभारं विसंयुत्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३३।।
६२७ गंभीरपञ्हं मेधाविं मग्गामग्गस्स कोविदं।
उत्तमत्थं अनुप्पत्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३४।।
मराठी अनुवादः-
६२३. जो द्वेषरहित राहून शिवीगाळी, वध आणि बन्धन सहन करतो, क्षान्तिबळ हेंच ज्याचें सैन्यबळ, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३०)
६२४. अक्रोधी, व्रतवान्, शीलवान्, (लोभानें) न फुगलेला, दान्त व अन्तिम शरीर धारण करणारा, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३१)
६२५. कमल पत्रावरील पाण्याप्रमाणें, व आरीच्या अग्रावरील मोहरीच्या दाण्याप्रमाणें जो विषयोपभोगांत लिप्त होत नाहीं, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३२)
६२६. जो याच जन्मीं आपल्या दु:खाचा अन्त जाणतो, ज्यानें आपलें ओझें खालीं टाकलें व जो संयोगविरहित झाला, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३३)
६२७. गंभीरप्रज्ञ, मेधावी, मार्गामार्ग जाणण्यांत प्रवीण व उत्तमार्थ पावलेला, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३४)

६१९. मनुष्यांत जो कोणी गांवावर आणि राष्ट्रावर सत्ता चालवितो तो, हे वासेष्ठा, राजा आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(२६)