सुत्तनिपात 138
पाली भाषेतः-
६८२ सेलेन्ति गायन्ति च वादयन्ति च। भुजानि पोठेन्ति च नच्चयन्ति च पुच्छामि वोऽहं मेरुमुद्धवासिने। धुनाछ मे संसयं खिप्प मारिसा।।४।।
६८३ १सो(१ म.-यो.) बोधिसत्तो रतनवरो अतुल्यो। मनुस्सलोके हितसुखताय जातो।
सक्यानं गामे जनपदे लुम्बिनेय्ये। तेनऽम्ह तुट्ठा अतिरिव कल्परूपा।।५।।
६८४ सो सब्बसत्तुत्तमो अग्गपुग्गलो। नरासभो सब्बपजानमुत्तमो।
वत्तेस्सति चक्कं इसिव्हये वने। नदं व सीहो बलवा मिगा२भिभू।।६।।(२ रो.-मिगाधिभू.)
६८५ तं सद्दं सुत्वा तुरितं अवंसरी सो। सुद्धोदनस्स तद भवनं उपागमि।
निसज्ज तत्थ इदं अवोचासि सक्ये। कुहिं कुमारो अहमपि दट्ठुकामो।।७।।
मराठी अनुवादः-
६८२ कांहीं शीळ घालीत आहेत, कांहीं गात आहेत, कांहीं वाजवीत आहेत, कांहीं दंड थोपटीत आहेत आणि कांहीं नाचत आहेत, तें कां? हें मी तुम्हां मेरुपर्वतावर राहणार्यांना विचारतों. हे मारिषांनो, तुम्ही माझा संशय लौकर दूर करा.(४)
६८३ (देव-) तो वररत्नासारखा अतुल बोधिसत्त्व मनुष्यलोकीं लुंबिनीप्रदेशांत शाक्यांच्या गांवीं जगताच्या कल्याणासाठीं जन्मला आहे. त्यामुळें आम्ही अत्यंत हृष्ट-तुष्ट झालों आहोंत.(५)
६८४ तो सर्व प्राण्यांत उत्तम, अग्रपुरुष, मनुष्यर्षभ, व सर्व लोकांत श्रेष्ठ, आपल्या गर्जनेनें सर्व मृगांचा पराभव करणार्या बलवान् सिंहाप्रमाणें, (सर्वांचा पराभव करून) ऋषिपत्तन नांवाच्या वनांत धर्मचक्र प्रवर्तित करील.(६)
६८५ तेव्हां तें देवाचें वचन ऐकून, तो (ऋषि) खाली उतरला (व) शुद्धोदनाच्या घरीं आला, व तेथें बसून शाक्यांना म्हणाला-कुमार कोठें आहे? मीही त्याला पाहूं इच्छितों.(७)
पाली भाषेतः-
६८६ ततो कुमारं जलितं इव सुवण्णं। उक्कामुखे व सुकुसलसम्पहट्ठं।
दद्दल्लमानं सिरिया अनोमवण्णं। दस्सेसुं१(१ म.-दस्सिमु.) पुत्तं असितव्हयस्स सक्या।।८।।
६८७ दिस्वा कुमारं सिखिमिव पज्जलन्तं। तारासभं व नभसिगमं विसुद्धं।
सुरियं तपन्तं सरदरिव२ २अब्भमुत्तं।(२-२ म.-सारदिरावब्यबमुत्तं.) आनन्दजातो विपुलमलत्थ पीतिं।।९।।
६८८ अनेकसाखं च सहस्समण्डलं। छत्तं मरू धारयुं अन्तलिक्खे।
सुवण्णदण्डा वीतिपतन्ति चामरा। न दिस्सरे चामरछत्तगाहका।।१०।।
मराठी अनुवादः-
६८६. त्यावर शाक्यांनीं, हुशार सोनारानें मुशींत घालून प्रज्वलित करून ठोकून तयार केलेल्या सोन्याप्रमाणें कान्तीनें दैदिप्यमान व उत्तमवर्ण, अशा त्या बालक पुत्राला ‘असित’ नांवाच्या (ऋषीला) दाखविलें.(८)
६८७ अग्नीप्रमाणें प्रज्वलणार्या, आकाशांत संचार करणार्या तारापति चन्द्राप्रमाणें विशुद्ध, आणि शरदऋतूंत अभ्रांपासून मुक्त झालेल्या सूर्याप्रमाणें प्रकाशणार्या त्या बालकाला पाहून ऋषि आनंदित झाला व विपुल प्रेम पावला.(९)
६८८ देवांनीं अंतरिक्षांत अनेक काठ्यांचें आणि हजार मंडलांचें छत्र धरलें, व सोन्याच्या दांड्यांचीं चामरें उडूं लागली; पण चामरें आणि छत्र धारण करणारे दिसत नव्हते.(१०)