सुत्तनिपात 48
पाली भाषेत :-
२२७ ये पुग्गला अट्ठ सतं पसत्था। चत्तरि एतानि युगानि होन्ति।
ते दक्खिणेय्या सुगतस्स सावका। एतेसु दिन्नानि महप्फलानि।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।६।।
२२८ ये सुप्पयुत्ता मनसा दळहेन। निक्कमिनो गोतमसासनम्हि।
ते पत्तिपत्ता अमतं विगय्ह। लद्धा मुधा निब्बुतिं भुज्जमाना।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।७।।
२२९ यथिन्दखीलो पठविं सितो सिया। चतुब्भि वातेहि असम्पकम्पियो।
तथूपमं सप्पुरिसं वदामि। यो अरियसच्चानि अवेच्च पस्सति।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।८।।
मराठीत अनुवाद :-
२२७. सज्जनांना पसंत ज्या आठ१ (१ आठ व्यक्तींसाठी ‘समाधिमार्ग’ (पृष्ट ७२) संघानुस्मृति पहा. ) व्यक्ति, ज्यांच्या चार जोड्या होतात, ते सुगताचे श्रावक पूजनीय होत; त्यांना दिलेलें दान महत्फलदायक होतें; संघाचें ठायीं वसणारें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (६)
२२८. जे सर्वस्वाचा त्याग करून दृढ मनानें गोतमाच्या पंथांत प्रवेश करतात, ते प्राप्तव्य प्राप्त करून आणि अमृताचें अवगाहन करून आनायासें मिळविलेल्या शांतीचा उपभोग घेतात. संघाचे ठायीं वसणारें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (७)
२२९. नगरद्वारासमोर पृथ्वींत (खोल रोवून) उभारलेला स्तम्भ जसा चारही बाजूंच्या वार्यांनीं हालत नाहीं, तसा जो चार आर्यसत्यें विचारपूर्वक जाणतो तो सत्यपुरुष आहे, असें मी म्हणतों. संघाचे ठायीं वसणारें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (८)
पाली भाषेत :-
२३० ये अरियसच्चानि विभावयन्ति। गंभीरपञ्ञेन सुदेसितानि।
किञ्चापि ते होन्ति भुसप्पमत्ता। न ते भवं अट्ठमं आदियन्ति।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।९।।
२३१ सहावऽस्स दस्सनसंपदाय। तयस्सु धम्मा जहिता भवन्ति।
सक्कायदिट्ठि विचिकिच्छितं च। सलिब्बतं वाऽपि यदत्थि किञ्चि।
चतूहपायेहि च विप्पमुत्तो। छ चाभिठानानि अभब्बो कातुं।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१०।।
मराठीत अनुवाद :-
२३०. जे गंभीर-प्रज्ञानें (बुद्धानें) उत्तम रीतीनें उपदेशिलेल्या चार आर्यसत्यांची भावना करतात, ते जरी कितीही बेसावधपणें वागले तरी आठवा जन्म घेत नाहींत. संघाचे ठायीं वसणारें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो.१ (१ ही व ह्याच्या खालच्या दोन गाथा स्त्रोतापन्नाला उद्देशून आहेत. ‘समाधिमार्ग’ पृष्ठ १०६ पहा.) (९)
२३१. सम्यक् दृष्टि प्राप्त झाल्याबरोबर तो (वरच्यापैकीं एक) देहात्मदृष्टि, कुशंका व व्रतउपासासारख्या एकाद्या गोष्टींवर असलेला विश्वास, या तीन गोष्टी सोडून देतो, चार दुर्गतीपासून२ (चार दुर्गति किंवा अपाय= नरक, तिर्यकूयोनि, प्रेतविषय आणि असुरलोक. सहा गोष्टी= मातृघात, पितृघात, अर्हद्वध, तथागताला जखम करणें, संघभेद व बुद्धेतर गुरूला भजणें) मुक्त होतो व सहा गोष्टी त्याच्या हातून घडणें असंभवनीय होतें. संघाचे ठायीं वसणारें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (१०)