सुत्तनिपात 4
पाली भाषेत :-
१७ यो नीवरणे पहाय पंच अनिघो१ (१ सी., अ.-अनीघो.) तिण्णकथंकथो विसल्लो।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।२।।
उरगसुत्तं निट्ठितं |
[२. धनियसुत्तं]
१८ पक्कोदनो दुद्ध२(२ म.-खिरो.) खीरोऽहमस्मि (इति धनियो गोपो)
अनुतीरे महिया समानवासो।
छन्ना कुटि आहितो गिनि
अथ चे पत्थयसी३ (३ म.-पत्थयसि.) पवस्स देव।।१।।
मराठीत अनुवाद :-
१७. जो पांच (बुद्धीचीं) आवरणें१ [बुद्धीचीं आवरणें (नीवरणें) हीं पांच आहेत:- कामच्छन्द, व्यापाद (द्वेषबुद्धि), आळस, भ्रान्तचत्तता व कुशंका. विशेष माहितीसाठीं ‘समाधिमार्ग’ पृष्ठ ३२ पहा. ] सोडून निर्दु:ख, नि:शंक आणि तृष्णाशल्यविरहित होतो तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१७)
उरगसुत्त समाप्त़
२
[२. धनियसुत्त]
१८ “माझे अन्न तयार आहे, व गाई दोहून झाल्या आहेत,” असें धनिय गोप म्हणाला--, “मही नदीच्या तीरीं मी प्रियजनांसह राहत आहें, माझी कुटी शाकारलेली आहे, व आग पेटवलेली आहे, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (१)
पाली भाषेत :-
१९ अक्कोधनो विगत१ (१ रो.-खीलो.) खिलोऽहमस्मि (इति भगवा)
अनुतीरे महियेकरत्तिवासो
विवटा कुटि निब्बुतो गिनि
अथ चे पत्थेयसी२ (२ म.-पत्थयसि.) पवस्स देव।।२।।
२० अंधकमकसा न विज्जरे (इति धनियो गोपो)
कच्छे३ (३ म.-गच्छे) रूळहतिणे चरन्ति गावो।
वुट्ठिंऽपि सहेय्युं आगतं
अथ चे पत्थयसी पवस्स देव।।३।।
मराठीत अनुवाद
१९. “मी अक्रोधन आणि विगतखिल१ [उखर जमिनीला खिल म्हणतात. अशा तर्हेचें काठिन्य ज्याच्या चित्तांतून गेलें तो विगतखिल. चित्ताचें पांच खिल आहेत, त्यांचें वर्णन मज्झिम-निकायांतील चेतोखिल सुत्तांत (नं १६ सांपडतें.)] आहे.” असें भगवान् म्हणाला,- “महीच्या कांठीं (केवळ) एका रात्रीचा निवास आहे, माझी कुटी उघडी आहे व अग्नि२ [अग्नि ११ आहेत. ते हे:- काम, क्रोध, मोह, जाति, जरा, मरण, शोक, परिदेव, दु:ख, दौर्मनस्य, उपायास. (महावग्ग, आदित्तपरियायसुत्त पहा.)] विझलेला आहे, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (२)
२०. “येथें गोमाशा३ [३. अ.-काण (ल.) मक्षिका किंवा पिंगल मक्षिका] व डांस नाहींत,”-असें धनिय गोप म्हणाला,-“नदीकांठीं वाढलेल्या गवतांत गाई चरतात, तेव्हां पाऊस आला तरी त्या सहन करतील, तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर!” (३)