सुत्तनिपात 52
पाली भाषेत :-
१५
[३. हिरिसुत्तं]
२५३ हिरिं तरन्तं विजिगुच्छमानं। सखाऽहमस्मि इति भासमानं।
सय्हानि कम्मानि अनादियन्तं। नेसो ममं ति इति नं विजञ्ञा।।१।।
मराठीत अनुवाद :-
१५
[३. हिरिसुत्त]
२५३. निर्लज्ज, उबग आणणारा, ‘मी तुझा मित्र आहे’ असें म्हणतो, पण मित्राचीं शक्य असलेलीं कर्तव्यें करीत नाहीं—असा माणूस आपला नव्हे असें समजावें. (१)
२५४. जो मित्रांशीं गोड बोलतो पण त्याप्रमाणें वागत नाहीं, अशा बोलण्याप्रमाणें न वागणार्याला सुज्ञ ओळखतात. (२)
पाली भाषेत :-
२५५ न सो मित्तो यो सदा अप्पमत्तो। भेदासंकी रंधमेवानुपस्सी।
यस्मिं च सेति उरसीव पुत्तो। स वे भित्तो यो परेहि अभेज्जी।।३।।
२५६ पामुज्जकरणं ठानं पसंसावहनं सुखं।
फलानिसंसो भावेति वहन्तो पोरिसं धुरं।।४।।
२५७ पविवेकरसं पीत्वा रसं उपसमस्स च।
निद्दरो होति निप्पापो धम्मपीतिपसं पिबं ति।।५।।
हिरिसुत्तं निट्ठितं।
मराठीत अनुवाद :-
२५५. जो रन्ध्रच शोधीत असतो व मैत्री तुटेल या शंकेनें सावधानपणें वागतो, तो मित्र नव्हे. बापाच्या वक्षस्थलावर मुलगा जसा विश्वस्तपणें निजतो, तशा रीतीनें ज्याच्याशीं विश्वस्तपणानें वागता येतें असा, व परके ज्याला भेदूं शकत नाहींत असा जो, तोच खरा मित्र होय. (३)
२५६. तो पुरुषास साजेल अशा तर्हेची धुरा वाहणारा, शुद्ध फळाच्या लाभासाठीं आनंददायक, प्रशंसावह व सुखकारक अशाच (पराक्रमाची) अभिवृद्धि करतो. (४)
२५७. तो एकान्तवासरसाचा आणि शान्तिरसाचा आस्वाद घेऊन धर्मप्रीतिरस पिणारा निर्भय आणि निष्पाप होतो. (५)
हिरिसुत्तं१(१ या सुत्ताच्या पाच गाथा निरनिराळ्या चार प्रश्नांच्या उत्तरादाखल आहेत, असें टीकाकाराचें म्हणणें; पण त्या खोट्या आणि खर्या मित्रांसंबंधींच असाव्यात असें वाटतें व तसाच अर्थ धरून त्यांचें भाषांतर केलें आहे.) समाप्त

- २५४ अनन्वयं१(१ म. अत्थन्वयं.) पियं वाचं यो मित्तेसु पकुब्बति।