सुत्तनिपात 181
पाली भाषेत :-
९०५ परस्स चे वम्भयितेन हीनो। न कोचि धम्मेसु विसेसि अस्स।
पुथू हि अञ्ञस्स वदन्ति धम्मं। निहीनतो सम्हि दळ्हं वदाना।।११।।
९०६ स-धम्मपूजा च पना तथेव। यथा पसंसन्ति सकायनानि।
सब्बे पवादा तथिवा भवेय्युं। सुद्धि हि तेसं पच्चत्तमेव।।१२।।
९०७ न ब्राह्मणस्स परनेय्यमत्थि। धम्मेसु निच्छेय्य समुग्गहीतं।
तस्मा विवादानि उपातिवत्तो। न हि सेट्ठतो पस्सति धम्ममञ्ञं।।१३।।
९०८ जानामि पस्सामि तथेव एतं। दिट्ठिया एके पच्चेन्ति सुद्धिं।
अद्दक्खि चे किं हि तुमस्स तेन। अतिसित्वा अञ्ञेन वदन्ति सुद्धिं।।१४।।
मराठीत अनुवाद :-
९०५ दुसर्यानें केलेल्या निंदेनें जर हीन ठरतो तर कोणत्याही पंथाचा माणूस श्रेष्ठ होऊं शकत नाहीं. कारण आपल्या पंथाचें दृढ समर्थन करणारे भिन्न भिन्न लोक इतरांच्या पंथाला हीनच म्हणतात. (११)
९०६ आणि जेव्हां ते आपापल्या पंथाची स्तुति करतात, तेव्हां ते स्वत:च्या धर्माची पूजाच करतात; आणि मग तीं सर्वच मतें खरीं ठरतील. कारण त्यांच्या मतें प्रत्येक पंथाची शुद्धि ही आत्मनिष्ठ (म्हणजे स्व-कपोल-कल्पितच) आहे.(१२)
९०७ पण (खर्या) ब्राह्मणाला दुसर्याकडून शिकण्यासारखें कांहीं नाहीं; किंवा सर्व गोष्टींचा विचार करून दृढपणें स्वीकारलेलें असें सांप्रदायिक मतही नाहीं. म्हणून तो वादविवाद ओलांडून जातो. कारण कोणताही धर्मपंथ श्रेष्ठ आहे, असें तो समजत नाहीं. (१३)
९०८ ‘हें मी जाणतों व पाहतों, हें तसेंच आहे’ - अशा दृष्टीनें शुद्धी होते असें कित्येक समजतात.’ पण असें त्यांनीं पाहिल्यानें तुम्हांस त्याचा फायदा कोणता? योग्य मार्ग सोडून भलत्याच मार्गानें शुद्धि होते असेंच केवळ ते म्हणतात. (१४)