सुत्तनिपात 55
पाली भाषेत :-
१७
[५. सूचिलोमसुत्तं]
एवं मे सुतं। एकं समयं भगवा गयायं विहरति टंकितमञ्चे सूचिलोमस्स यक्खस्स भवने। तेन खो पन समयेन खरो च यक्खो सूचिलोमो च यक्खो भगवतो अविदूरे अतिक्कमन्ति। अथ खो खरो यक्खो सूचिलोमं यक्खं एतदवोच—एसो समणो ति। नेसो समणो, समणको एसो; याव जानामि यदि वा सो समणो, यदि वा समणको ति। अथ खो सूचिलोमो यक्खो येन भगवा तेनुपसंकमि उपसंकमित्वा भगवतो काय उपनामेसि। अथ खो भगवा काय अपनामेसि। अथ खो सूचिलोमो यक्खो भगवन्तं एतदवोच—भायसि मं समणा ति। न ख्वाहं तं आवुसो भायामि, अपि च ते संफस्सो पापको ति। पञ्हं तं समण पुच्छिस्सामि, सचे मे न व्याकरिस्ससि, चित्तं वा ते खिपिस्सामि, हृदयं वा ते फालेस्सामि, पादेसु वा गेहत्वा पारगंगाय खिपिस्सामी ति। न ख्वाहं तं आवुसो पस्सामि सदेवके लोके समारके सब्रह्मके सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय यो मे चित्तं वा खिपेय्य, हृदयं वा फालेय्य, पादेसु वा गहेत्वा पारगंगाय खिपेय्य। अपि च त्वं आवुसो पुच्छ यदाकंखसी ति। अथ खो सूचिलोमो यक्खो भगवन्तं गाथाय अज्झभासि—
२७० रागो च दासो च कुतो निदाना। अरती रती लोमहंसो कुतोजा।
कुतो समुट्ठाय मनोवितक्का। कुमारका धक१मिवोस्सजन्ति(१ रो.-बंक)।।१।।
मराठीत अनुवाद :-
१७
[५. सूचिलोमसुत्त]
असें मी एकलें आहे. एके समयीं भगवान् गया येथें टंकितमंचकावर सूचिलोम यक्षाच्या भवनांत राहत होता. त्या वेळीं खर यक्ष व सूचिलोम यक्षाच्या भवनांत राहत होता. त्या वेंळी खर यक्ष व सूचिलोम यक्ष भगवन्तापासून थोड्या अंतरावर फिरत होते. तेव्हां खर यक्ष सूचिलोम यक्षास म्हणाला, “हा श्रमण आहे.” “हा श्रमण नव्हे, हा श्रमणक आहे. हा श्रमण आहे कीं श्रमणक आहे हें मी पाहतों,” असें म्हणून सूचिलोम यक्ष भगवन्तापाशीं गेला, व जवळ जाऊन आपल्या शरिरानें भगवन्ताला धक्का देण्याचा प्रयत्न करूं लागला. तेव्हां भगवान् त्याच्यापासून दूर झाला. त्यावर सूचिलोम यक्ष भगवन्ताला म्हणाला “श्रमणा, मला भितोस काय?” “आयुष्मन्, मी तुला भीत नाहीं, पण तुझा संपर्क अपवित्र आहे.” “श्रमणा, मी तुला प्रश्न विचारतों, त्याचें जर तूं बरोबर उत्तर दिलें नाहींस, तर तुला मी वेड लावीन, किंवा तुझें हृदय फाडीन, अथवा तुझ्या पायाला धरून मला गंगेच्या पार फेकीन. आयुष्मन् या सदेवक, सब्रह्मक, समारक लोकीं श्रमणब्राह्मणांत अथवा देवमनुष्यांत असा कोणी मला दिसत नाहीं कीं, जो मला वेड लावीत किंवा माझें ह्यदय फाडील, अथवा माझ्या पायाला धरून मला गंगेच्या पार फेकील. तथापि, आयुष्मन् तुझ्या इच्छेप्रमाणें प्रश्न विचार. तेव्हां सूचिलोम यक्ष भगवन्ताला गाथेनें म्हणाला—
२७०. काम आणि क्रोध कोठून उत्पन्न होतात? अरति, रति आणि रोमहर्ष (भय) कोठून होतात? कोठून उत्पन्न होतात? कोठून उत्पन्न होऊन हो वितर्क, द्वाड मुलगे जसे कावळ्याला (दोरीला बांधून) उडवितात, तसें मनाला उडवितात? (१)