सुत्तनिपात 88
पाली भाषेत :-
४४८ अलद्धा तत्थ अस्सादं वायसेत्तो अपक्कमि।
काको व सोलमासज्ज१(१सी.-सेलमावज्ज.) निब्बिजापेम गोतमं२(२सं.नि.१..१२४८.१२७१७ गोतमा।) ।।२४।।
४४९ तस्स सोकपरेतस्स वीणा कच्छा अभस्सय।
ततो सो दुम्मनो यक्खो तत्थेलऽन्तरधायथा ति।।२५।।
पधानसुत्तं निट्ठितं।
२९
[३. सुभासितसुत्तं]
एवं मे सुतं। एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने....पे....भगवा एतदवोच-चतूहि भिक्खवे अंगेहि समन्नागता वाचा सुभासिता होति, न दुब्भासिता, अनवज्जा च अननुवज्जा१.(१ म.-अनुपवज्जा.) च विञ्ञूनं। कतमेहि चतूहि। इध भिक्खवे भिक्खु सुमासितं येव भासति नो दुब्भासितं, धम्मं येव भासति नो अधम्मं, पियं येव भासति नो अप्पियं, सच्चं येव भासति नो अलिकं। इमेहि खो भिक्खवे चतूहि अंगेहि समन्नागता वाचा सुभासिता होति, नो दुब्भासिता, अनवज्जा च अननुवज्जा च विञ्ञूनं ति। इदमवोच भगवा, इदं वत्वा सुगतो अथापरं एतदवोच सत्था—
४५० सुभासितं उत्तममाहु सन्तो। धम्मं भणे नाधम्मं तं दुतियं।
पियं भणे नापिपयं तं ततियं। सच्चं भणे नालिकं तं चतुत्थ ति।।१।।
मराठीत अनुवाद :-
४४८. पण त्यांत कांहीच आस्वाद न सांपडल्यामुळें कावळा तेथून निघून गेला. तो कावळा जसा त्या शिळेवर प्रहार करून निराश होऊन पळाला, तसा मी गोतमापासून निराश होऊन निघून जातों.”(२४)
४४९. शोकाकुल झालेल्या त्या माराच्या कांखेंतून वीणा खाली पडला. तदनंतर खिन्न झालेला तो यक्ष (मार) तेथेंच अन्तर्धान पावला.(२५)
पधानसुत्त समाप्त
२९
[३. सुभासितसुत्त]
असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. तेथें भगवान् भिक्षूंना उद्देशून म्हणाला, ‘हे भिक्षूंनो.’ ‘भदन्त’ असें त्या भिक्षूंनी भगवन्ताला उत्तर दिलें. तेव्हां भगवान् म्हणाला—भिक्षूंनो, चार अंगांनी जी संपन्न, ती सुभाषित वाणी; ती दुर्भाषित नव्हे. ती निर्दोष आणि पंडितांना मान्य होय. तीं चार अंगें कोणती? एकादा भिक्षु सुभाषितच बोलतो, दुर्भाषित बोलत नाहीं; धर्मच बोलतो, अधर्म बोलत नाहीं; प्रियच बोलतो, अप्रिय बोलत नाही; सत्यच बोलतो, असत्य बोलत नाहीं—या चार अंगांनीं संपन्न, ती सुभाषित वाणा, दुर्भाषित नव्हे; ती निर्दोष आणि पंडितांना मान्य होय, असें भगवान् बोलला. असें बोलून तदनंतर तो सुगत शास्ता आणखी असें म्हणाला—
४५०. सन्त असें म्हणतात कीं, सुभाषित (वाचा बोलावी) ही उत्तम गोष्ट; धर्म बोलावा, अधर्म बोलूं नये ही दुसरी; प्रिय बोलावें, अप्रिय बोलूं नये ही तिसरी; सत्य बोलावें असत्य बोलूं नये ही चवथी(१)
पाली भाषेत :-
अथ खो आयस्मा वंगीसो उट्ठायासना एकंसं चीवरं कत्वा येन भगवा तेनऽञ्जलिं पणामेत्वा भगवन्तं एतदवोच—पटिभाति मं सुगता ति। पटिभातु तं वंगीसा ति भगवा अवोच। अथ खो आयस्मा वंगीसो भगवन्तं सम्मुखा सारुप्पाहि गाथाहि अभित्थवि—
४५१ तमेव भासं भासेय्य यायऽत्तानं न तापये।
परे च न विहिंसेय्य सा वे वाचा सुभासिता।।२।।
४५२ पियवाचमेव भासेय्य या वाचा पटिनन्दिता।
यं अनादाय पापनि परेसं भासते पियं।।३।।
४५३ सच्चं वे अमता वाचा एस धम्मो सनन्तनो।
सच्चे अत्थे च धम्मे च आहु सन्तो पतिट्ठिता।।४।।
मराठीत अनुवाद :-
त्यावर आयुष्मान् वंगीस आसनावरून उठला व एका खांद्यावर चीवर करून भगवंतासमोर अंजलि करून भगवन्ताला म्हणाला—‘भगवन्, मी बोलूं इच्छितों.’ ‘वंगीस, तुला बोलावयाचें असेल तें बोल,’ असें भगवान् म्हणाला. तेव्हां आयुष्मान् वंगीसानें योग्य गाथांनीं भगवन्ताची समक्ष स्तुति केली—
४५१. अशीच वाणी बोलावी कीं जिच्यामुळें आपणांवर पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाहीं, व इतरांना त्रास होत नाहीं; तीच खरी सुभाषित वाणी होय.(२)
४५२. जिच्यायोगें बोलणारा दुसर्याच्या वाईट गोष्टींचा विचार न करतां प्रिय तेवढेंच बोलतो, अशी इतरांना आवडणारी जी प्रिय वाचा तीच बोलावी.(३)
४५३. पण सत्य वाणी अमृतवाणी होय, व हा सनातन धर्म होय. सत्य, सदर्थ आणि धर्म यांतच संत दृढ राहतात असें म्हणतात.(४)