सुत्तनिपात 45
पाली भाषेत :-
२१२ पञ्ञाबलं सीलवतूपपन्नं। समाहितं झानरतं सतीमं।
संगा पमुत्तं अखिलं१ (१ सी.- सखिलं.) अनासवं। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।६।।
२१३ एकं चरन्तं मुनिं अप्पमत्तं। निन्दापसंसासु अवेधमानं।
सीहं व सुद्देसु असन्तसन्तं। वातं व जालम्हि असज्जमानं।
पदुमं व तोयेन अलिप्पमानं। नेतारमञ्ञेसमनञ्ञनेय्यं।
तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।७।।
२१४ यो ओगाहने२ (२ अ., रो., म. –ओगहणे; सी.- गाहणे.) थम्मोरिवाभिजायति। यस्मिं परे वाचापरियन्तं३ (३ म.- वाचं.) वदन्ति।
तं वीतरागं सुसमाहितिन्द्रियं। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।८।।
२१५ यो वे ठितत्तो तसरं व उज्जुं। जिगुच्छति कम्मेहि पापकेहि।
वीमंसमानो विसमं सभं च। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।९।।
२१६ यो सञ्ञतत्तो न करोति पापं। दहरो च मज्झो च मुनी यतत्तो।
अरोसनेय्यो सो न रोसेति कंचि। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।१०।।
२१७ यदग्गतो मज्झतो सेसतो वा। पिण्डं लभेथ परदत्तूपजीवी।
नालं थुतुं नाऽपि निपच्चवादी। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।११।।
२१८ मुनिं चरन्तं विरतं मेथुनस्मा। यो योब्बने न उपनिबज्झते क्कचि।
मदप्पमादा विरतं विप्पमुत्तं। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।१२।।
मराठीत अनुवाद :-
२१२. प्रज्ञा हें ज्याचें बळ जो शीलव्रतानें संपन्न, समाहितं (चित्त समतोल ठेवणारा), ध्यानरत, स्मृतिमान्, संगापासून मुक्त, अकठिन१ (१. १९ व्या गाथेवरील टीप पहा.) व अनाश्रव— त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (६)
२१३. एकाकी राहणारा, अप्रमत्त मुनि, निन्देनें व स्तुतीनें न गडबडणारा, सिंहाप्रमाणें शब्दांना न घाबरणारा, वार्याप्रमाणें जाळ्यांत न अडकणारा, कमलाप्रमाणें पाण्यांत अलिप्त राहणारा, इतरांचा नेता पण ज्याला नेता नाहीं असा— त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (७)
२१४. ज्याच्याविषयीं लोक वाटेल तें बोलतात, तरी जो घाटावरील२ (२. घाटांवर चौकोनी अथवा अष्टकोनी खांब बांधीत असत व त्यांवर सर्व जातींचे लोक पाठ घाशीत असत.) स्तम्भाप्रमाणें स्थिर राहतो, जो वीतराग व सुसमहितेन्द्रिय— त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (८)
२१५. जो सरळ घोट्याप्रमाणें स्थितात्मा, जो पापकर्मांचा तिरस्कार करतो, आणि विषम सम यांची पारख करतो— त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (९)
२१६. लहान असो वा मध्यम वयाचा असो, जो संयतात्मा, यतात्मा मुनि पाप करीत नाहीं, रागावत नाहीं, दुसर्या कोणालाही राग आणीत नाहीं— त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (१०)
२१७. जो इतरांनीं दिलेल्या अन्नावर उपजीविका करणारा, अन्न शिजविलेल्या भांण्डयांतून वरच्या, मधल्या अथवा तळांतल्या अन्नाची भिक्षा मिळाली असतां स्तुति किंवा निंदा करीत नाहीं— त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (११)
२१८. जो मुनी स्त्रीसंगापासून विरत होऊन हिंडतो, जो यौवनांत कोठेंही बद्ध होत नाहीं, जो मदप्रमादापासून विरत व मुक्त त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (१२)