सुत्तनिपात 113
पाली भाषेतः-
५५७ मया पवत्तितं चक्कं (सेला ति भगवा) धम्मचक्कं अनुत्तरं।
सारिपुत्तो अनुवत्तेति अनुजातो तथागतं।।१०।।
५५८ अभिञ्ञेय्यं अभिञ्ञातं भावेतब्बं च भावितं।
पहातब्बं पहीनं मे तस्मा बुद्धोऽस्मि ब्राह्मण।।११।।
५५९ विनयस्सु मयि१ कंखं अधिमुच्चस्सु ब्राह्मण।(१ रो.-मयी.)
दुल्लभं दस्सनं होति संबुद्धानं अभिण्हसो।।१२।।
५६० येसं वे२(२ रो., सी.-वो). दुल्लभो लोके पातुभावो अभिण्हसो।
सोऽहं ब्राह्मण संबुद्धो सल्लकत्तो अनुत्तरो।।१३।।
५६१ ब्रह्मभूतो अतितुलो मारसेनप्पमद्दनो।
सब्बामित्ते वसी कत्वा मोदामि अकुतोभयो।।१४।।
मराठी अनुवादः-
५५७. मी जें चक्र—हे सेला, असें भगवान् म्हणाला—जें अनुत्तर धर्मचक्र प्रवर्तित केलें. तें तथागताच्या मागोमाग जाणारा शारिपुत्र चालूं ठेवील.(१०)
५५८. हे ब्राह्मणा, जें अभिज्ञेय तें मीं जाणलें, जें भावनीय त्याची भावना केली, व जें त्याज्य त्याचा मी त्याग केला, आणि म्हणून मी बुद्ध आहें. (११)
५५९. हे ब्राह्मणा, माझ्याविषयीं शंका सोड, आणि श्रद्धा धर; कारण, संबुद्धांचें दर्शन वारंवार होणें कठिण आहे. (१२)
५६०. हे ब्राह्मणा, ज्यांचा या जगांत वारंवार प्रादुर्भाव दुर्लभ अशांपैकीं, मी एक अनुत्तर, (हृदयांतील) शल्य काढणारा संबुद्ध आहे. (१३)
५६१. ब्रह्मभूत, अनुपम व मारसेनेचें मर्दन करणारा असा मी सर्व शत्रूंवर जय मिळवून व अकुतोभय होऊन आनंदांत आहें. (१४)