सुत्तनिपात 118
पाली भाषेतः-
५७६ फलानमिव पक्कानं पातो पपतना१ भयं।(१ म.-पतनतो, अ.- पपततो.)
एवं जातानं मच्चानं निच्चं मरणतो भयं।।३।।
५७७ यथाऽपि कुंभकारस्स कता मत्तिकभाजना।
सब्बे भेदनपरियन्ता एवं मच्चान जीवितं।।४।।
५७८ दहरा च महन्ता च ये बाला ये च पण्डिता।
सब्बे मच्चुवसं यन्ति सब्बे मच्चुपरायणा।।५।।
५७९ तेसं मच्चुपरेतानं गच्छतं परलोकतो।
न पिता तायते पुत्तं ञाति वा पन ञातके।।६।।
५८० पेक्खतं येव ञातीनं पस्स लालपतं पुथु।
एकमेको च मच्चानं गो वज्झो२ विय निय्यति।।७।।(२ म.-वजो.)
मराठी अनुवादः-
५७६. पिकलेल्या फळांना जसें सकाळीं खालीं पडण्याचें भय, तसें जन्मलेल्या मर्त्यांना नेहमींच मरणाचें भय आहे.(३)
५७७. कुंभारानें केलेल्या मातीच्या भांड्याचें जसें फुटण्यांत पर्यवसान होतें, तसें मर्त्याच्या जीविताचें (मृत्यूंत) होतें. (४)
५७८. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. हे सर्व मृत्युपरायण आहेत.(५)
५७९. मृत्यूनें ग्रासलेले ते परलोकीं जात असतां पिता पुत्राचें किंवा आप्त आप्तांचें रक्षण करूं शकत नाहीं.(६)
५८०. पहा, आप्त पाहत असतां व अनेक प्रकारें शोक करीत असतां मर्त्यांपैकीं प्रत्येक जण वध्य गाईप्रमाणें नेला जातो. (७)
पाली भाषेतः-
५८१ एवमब्भाहतो लोको मच्चुना च जराय च।
तस्मा धीरा न सोचन्ति विदित्वा लोकपरियायं।।८।।
५८२ यस्स मग्गं न जानासि आगतस्स गतस्स वा।
उभो अन्ते असंपस्सं निरत्थं परिदेवसि।।९।।
५८३ परिदेवयमानो वे केचिदत्थं१ उदब्बहे।(१ म.- किच्चि अत्थं.)
सम्मूळ्हो हिंसमत्तानं कयिर चेनं विचक्खणो।।१०।।
५८४ न हि रुण्णेन२(२सी.-रुन्नेन.) सोकेन सन्तिं पप्पोति चेतसो।
भिय्यस्सुप्पज्जते दुक्खं सरीरं उपहञ्ञति।।११।।
५८५ किसो विवण्णो भवति हिंसमत्तानमत्तना।
न तेन पेता पालेन्ति निरत्था परिदेवना।।१२।।
मराठीत अनुवाद :-
५८१. याप्रमाणें मृत्यूनें आणि जरेनें हा लोक अभ्याहत झाला आहे. म्हणून हा एक लोक-प्रकार आहे हें जाणून सुज्ञ शोक करीत नसतात.(८)
५८२. ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाहीं व ज्याचे दोन्ही अन्त दिसत नाहींत, (अशाविषयीं) तूं वृथा शोक करतोस.(९)
५८३. शोकापासून जर कांहीं फायदा होण्यासारखा असेल, तर संमूढ होऊन व आपणाला कष्टवून, शाहण्या माणसानें शोक करावा.(१०)
५८४. पण रडण्यानें आणि शोकानें त्याच्या चित्ताला शान्ति मिळत नाहीं, दु:ख वाढतें व शरिरावर वाईट परिणाम होतो.(११)
५८५. आपणच आपणाला त्रास देणारा तो कृश आणि नस्तेज होतो. त्यायोगें मृतांना कांहीं संरक्षण प्राप्त करून घेतां येत नाहीं. म्हणून शोक व्यर्थ होय.