सुत्तनिपात 49
पाली भाषेत :-
२३२ किञ्चापि सो कम्मं करोति पापकं। कायेन वाचा उद चेतसा वा।
अभब्बो सो तस्स पटिच्छदाय। अभब्बता दिट्ठपदस्स वुत्ता।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।११।।
२३३ वनप्पगुम्बे यथा फुस्सितग्गे। गिम्हान मासे पठमस्मिं गिम्हे।
तथूपमं धम्भवरं अदेयसि। निब्बाणगामिं परमं हिताय।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१२।।
२३४ वरो वरञ्ञू वरदो वराहरो। अनुत्तरो धम्मवरं अदेसयि।
इदंऽपि बुध्दे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१३।।
मराठीत अनुवाद :-
२३२. जर त्याच्याकडून कायेनें, वाचेनें किंवा मनानें कांहीं पाप घडेल, तर तें तो कदापि झांकून ठेवणार नाहीं. असलें कृत्य (निर्वाण-) पद ज्यानें पाहिलें आहे अशाच्या हातून होणें शक्य नाहीं. संघाचे ठायीं असलेलें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (११)
२३३. उन्हाळ्याच्या पहिल्या१ (१ अ.-चैत्रमासांत; ज्याला ‘बालवसन्त’ असेंहि म्हणतात.) महिन्यांत जसा एकादा वनगुल्म साग्र प्रफुल्लित व्हावा, तद्वत् बुद्धानें निर्वाणगामी परमश्रेष्ठ धर्म लोकहितार्थ उपदेशिला. बुद्धाचें ठायीं असलेलें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (१२)
२३४. श्रेष्ठ, श्रेष्ठज्ञ, श्रेष्ठद, श्रेष्ठ अणणारा, अनुत्तर अशा बुद्धानें श्रेष्ठ धर्म उपदेशिला आहे. बुद्धाचें ठायीं असलेलें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (१३)
पाली भाषेत :-
२३५ खीणं पुराणं नवं नत्थि संभवं। विस्तचित्ता आयतिके भवस्मिं।
ते खीणबीजा अविरूळिहछन्दा। निब्बन्ति धीरा यथाऽयं पदीपो।
इदंऽपि संघे रतनं पणीतं। एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।१४।।
२३६ यानीध भूतानि समागतानि। भुम्मानि वा यानि व अन्तळिक्खे।
तथागतं देवमनुस्सपूजितं। बुद्धं नमस्साम सुवत्थि होतु।।१५।।
२३७ यानीध भूतानि समागतानि। भुम्मानि वा यानि व अन्तळिक्खे।
तथागतं देवमनुस्सपूजितं। धम्मं नमस्साम सुवत्थि होतु।।१६।।
२३८ यानीध भूतानि समागतानि। भुम्मानि वा यानि व अन्तळिक्खे।
तथागतं देवमनुस्सपूजितं। संघं नमस्साम सुवत्थि होतू ति।।१७।।
रतनसुत्तं निट्ठितं।
मराठीत अनुवाद :-
२३५. ज्याचें जुनें कर्म क्षीण झालें आहे व नवें उत्पन्न होत नाहीं, जो भावी जन्माविषयीं निरपेक्ष, ते क्षीणबीज आणि उत्पतिच्छन्दविरहित धीर पुरुष ह्या प्रदीपाप्रमाणें निर्वाण पावतात. संघाचे ठायीं असलेलें हें उत्तम रत्न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (१४)
२३६. जीं भूमिगत किंवा अन्तरिक्षांतील भूतें जमलीं असतील (त्यांना म्हणतों कीं,) आम्ही देवमनुष्यपूजित तथागत बुद्धाला नमस्कार करूं; येणेंकरून स्वस्ति होवो. (१५)
२३७. जीं भूमिगत किंवा अन्तरिक्षांतील भूतें येथें जमलीं असतील (त्यांना म्हणतों कीं,) देवमनुष्यपूजित तथागत धर्माला नमस्कार करूं; येणेंकरून स्वस्ति होवो. (१६)
२३८. जीं भूमिगत किंवा अन्तरिक्षांतील भूतें येथें जमलीं असतील (त्यांना म्हणतों कीं,) देवमनुष्यपूजित तथागत संघाला नमस्कार करूं; येणेंकरून स्वस्ति होवो. (१७)
रतनसुत्त समाप्त