सुत्तनिपात 173
पाली भाषेत :-
८५९ येन१ नं वज्जु२ पुथुज्जना अथो समणब्राह्मणा। (१ सी०, -तं.) (२ म०, नि०-वज्जुं )
तं तस्स अपुरेक्खतं३ तस्मा वादेसु नेजति।।१२।। ( ३ म० – अपुर )
८६० वीतगेधो अमच्छरी न उस्सेसु वदते मुनि।
न समेसु न ओमेसु कप्पं नेति अकप्पियो।।१३।।
८६१ यस्स लोके सकं नत्थि असता च न सोचति।
धम्मेसु च न गच्छति स वे सन्तो ति वुच्चती ति।।१४।।
पुराभेदसुत्तं निट्ठितं।
मराठी अनुवाद :-
८५९. ज्या एकाद्या दृष्टीचा (अनुयायी) म्हणून सामान्य जन अथवा श्रमण ब्राह्मण त्याला संबोधतील अशा दृष्टीचा तो पुरस्कार करीत नाहीं, आणि म्हणून वादविवादांनीं तो गडबडत नाहीं. (१२)
८६० वीतलोभ, अमत्सरी, आणि विकल्परहित मुनि आपणाला श्रेष्ठांत गणत नाहीं, आणि समानांत किंवा हीनांत आपली गणना करीत नाहीं. (१३)
८६१ ज्याला या जगांत स्वकीय असें कांहीं नाहीं, जो वस्तु नाहींशा झाल्या तरी शोक करीत नाहीं, आणि पदार्थांत गुंतून जात नाहीं, तोच शांत समजला जातो.( १४)
पुराभेदसुत्त समाप्त
४९
[११. कलहविवादसुत्तं]
पाली भाषेत :-
८६२ कुतो पहूता कलहा विवादा । परिदेवसोका सह मच्छरा च।
मानातिमाना सह पेसुणा च। कुतो पहूता ते तदिङघ ब्रूहि।।१।।
८६३ पिया१ पहूता कलहा विवादा । परिदेवसोका सह मच्छरा च। (१-१ म० - पिय्यप्पहूता.)
मानातिमाना सह पेसुणा च । मच्छरिययुत्ता कलहा विवादा।
विवादजातेसु च पेसुणानि।।२।।
८६४ पिया सु लोकस्मिं कुतोनिदाना । ये वाऽपि लोभा विचरन्ति लोके।
आसा च निट्ठा च कुतोनिदाना । ये संपरायाय नरस्स होन्ति।।३।।
४९
[११.कलहविवादसुत्त]
मराठी अनुवाद :-
८६२. “कलह आणि विवाद, परिदेव, शोक आणि मत्सर हे कोठून उत्पन्न होतात? आणि अहंकार, अतिमान, आणि चाहाड्या कोठून उत्पन्न होतात हें कृपा करून सांग.” (१)
८६३. “कलह आणि विवाद, परिदेव, शोक आणि मत्सर, अहंकार, अतिमान आणि चाहाड्या प्रिय वस्तूंपासून उत्पन्न होतात. मात्सर्यापासून कलह आणि विवाद उत्पन्न होतात, आणि वादविवादांत पडणार्या मनुष्यांमध्यें चाहाड्या उद्भवतात.” (२)
८६४. “या जगांत वस्तू प्रिय कशामुळें उत्पन्न होतात? जे जगांत लोभ वावरतात ते कशामुळें उत्पन्न होतात? आणि माणसांच्या पुनर्भवाला ज्या कारणीभूत होतात त्या आशा आणि निष्ठा (फलप्राप्ति) कशामुळें उत्पन्न होतात?” (३)