सुत्तनिपात 58
पाली भाषेत :-
२८३ सुद्धा सुद्धेहि संवासं कप्पयव्हो पतिस्सता।
ततो समग्गा निपका दुक्खस्सन्तं करिस्सथा ति।।१०।।
धम्मचरियसुत्तं१ निट्ठितं। (१ अ.-धम्मचरियसुत्तं ति कपिलसुत्तं.)
१९
[७. ब्राह्मणधम्मिकसुत्तं]
एवं मे सुतं। एकं समयं भगवा सावत्थिय विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे। अथ खो संबहुला कोसलका ब्राह्मणमहासाला जिण्णा वुद्धा महलक्का अद्धगता वयो अनुप्पत्ता येन भगवा तेनुपसंकमिंसु, उपसंकमित्वा भगवता सद्धिं सम्मोदिंसु, सम्मोदनीयं कथं साराणीयं वीतिसारेत्वा एकमन्तं निसीदिसुं। एकमन्तं निसिन्ना खो ते ब्राह्मणमहासाला भगवन्तं एतदवोचुं-संदिस्सन्ति नु खो भो गोतम एतरहि ब्राह्मणा पोराणानं ब्राह्मणानं ब्राह्मणधम्मे ति। न खो ब्राह्मणा सन्दिस्सन्ति एतरहि ब्राह्मणा पोराणानं ब्राह्मणधम्मे ति। साधु नो भवं गोतमो पोराणाने ब्राह्मणानं ब्राह्मणधम्मं भासतु, सचे भोतो गोतमस्स अगरू ति। तेन हि ब्राह्मणा सुणाथ, साधुकं मनसिकरोथ, भासिस्सामी ति। एवं भो ति खो ते ब्राह्मणमहासाला भगवतो पञ्चस्सोसुं। भगवा एतदवोच—
२८४ इसयो पुब्बका आसुं सञ्ञतत्ता। तपस्सिनो।
पञ्च कामगुणे हित्वा अत्तदत्थमचारिसु१( म. अत्तदत्थमचारयुं. सी. अत्तदत्थमकारिसुं.)।।१।।
२८५ न पसू ब्राह्मणानासुं न हिरञ्ञं न धानियं।
सज्झायधनधञ्ञा सुं ब्रह्म निधिमपालयुं।।२।।
मराठीत अनुवाद :-
२८३. तुम्ही शुद्ध व्हा, व सावधपणें शुद्धांशींच सहवास ठेवा. तदनंतर एकवाक्यतेनें आणि हुशारीनें वागून दु:खाचा अन्त करण्यास समर्थ व्हाल. (१०)
धम्मचरियसुत्त समाप्त
१९
[७. ब्राह्मणधम्मिकसुत्त]
असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. त्या वेळीं कोसल देशांतील कित्येक जीर्ण, वृद्ध, म्हातारे, उतार वयाचे, वय झालेले श्रीमंत ब्राह्मण भगवन्तापाशीं आले; येऊन भगवन्ताला कुशल समाचारादिक विचारून एका बाजूस बसले. एका बाजूस बसून ते कुलीन ब्राह्मण भगवन्ताला म्हणाले कीं, “भो गोतमा, आजकालचें ब्राह्मण जुन्या ब्राह्मणांच्या ब्राह्मणधर्माप्रमाणें चालणारे असे दिसून येतात काय?” “ब्राह्मणांनो, आजकालचे ब्राह्मण जुन्या ब्राह्मणांच्या ब्राह्मणधर्माप्रमाणें चालणारे दिसत नाहींत.” “जर भगवान् गोतमाला जड१ (१ अ-गरु-अडचणीचें वाटत नसेल, किंवा संकट वाटत नसेल.) वाटत नसेल, तर भगवान् गोतम आम्हांला जुना ब्राह्मणधर्म कोणता ते सांगो.” “असें आहे तर, हे ब्राह्मणांनो, ऐका व लक्ष द्या; मी सांगतो.” “ठीक आहे.” असें त्या कुलीन ब्राह्मणांनीं भगवन्ताला उत्तर दिलें. भगवान् म्हणाला:--
२८४. प्राचीन ऋषी संयतात्मा आणि तपस्वी होते. ते पञ्चेन्द्रियांच्या विषयांचा त्याग करून आत्मार्थचिन्तन करीत असत. (१)
२८५. त्यां ब्राह्मणांपाशीं पशू नव्हते, धन नव्हतें, धान्य नव्हतें. स्वाध्याय हेंच त्यांचें धनधान्य होतें व ते ब्राह्मणनिधीचें पालन करीत. (२)