Get it on Google Play
Download on the App Store

सोन्यामारुति 59

तिघे गाडींत बसले. गाडींत जागा होती. वसंताच्या शेजारच्या बाकावर पथार्‍या पसरून कोणी सुशिक्षित बसले होते. एक व्यापारी होता. एक वकील असावा. त्यांनीं वसंता वगैरेकडे वांकड्या नजरेनें पाहिलें.

वसंता : बसा म्हातारबाबा.

म्हातारा : मला लौकर उतरायचें आहे.

वेदपुरुष : कितवें स्टेशन ?

म्हातारा : तिसरें.

वसंता : तुमची जमीन बरीच आहे ?

म्हातारा : फार नाहीं, पोटापुरती आहे.

वसंता : कर्ज आहे कीं नाहीं ?

म्हातारा : कर्जाशिवाय कोण आहे बाबा ? एकहि शेतकरी कर्जाशिवाय मिळणार नाहीं. शेतकर्‍याची भारी वाईट आहे दशा.

वेदपुरुष
: कां बरें एवढें कर्ज ?

म्हातारा
: मागें लढाई होती ना ? त्या वेंळी आमच्या हातांत भरपूर पैसा होता. आम्हीं घरे बांधलीं, शेतांत विहिरी खणल्या, सावकारांचीं कर्जे काढून जमीन सुधारली. कर्ज म्हणजे हातचा मळ वाटे. परंतु एकदम भाव घटले, कर्ज उरावर बसलें. व्याजाचे दर त्या प्रमाणांत उतरलें नाहींत. पूर्वी ज्या मालाची पांचशे किंमत येई, त्याची आतां दोनशें येत नाहीं. परंतु कर्ज व व्याज पूर्वीच्याच दराचें सारें. पूर्वी शंभर रुपये व्याज भरायला जेवढें धान्य विकावें लागे, त्याच्या तिप्पट धान्य तेवढेंच व्याज देण्याला आतां विकावें लागतें! व्याज देतां येत नाहीं. त्यामुळें सारखें कर्जं फोंफावत आहे. जसा सावकार तसेंच सरकार. मागें लढाईंत भाव वाढले तर सरकारनें शेतसारे तिसरा हिस्सा वाढवले. परंतु आज आठ वर्षे धान्याला भाव नाहीं, तरी वाढलेले शेतसारे कमी होत नाहींत.

वसंता : शेतींत उत्पन्न तरी पूर्वीप्रमाणे येतें का ?

म्हातारा : नाहीं. पीकहि भरपूर येत नाहीं. पूर्वीच्याप्रमाणें पीक नाही, पूर्वीच्याप्रमाणें भाव नाहीं.

वसंता : तुम्ही मग कसें करतां ?

म्हातारा : काय सांगूं दादांनो! खोटें नाही सांगत. मागच्या वर्षी सुनेची पैठणी गहाण ठेवली. महावस्त्र गहाण ठेवलें. आतां या वर्षी आम्हांला विकण्याची पाळी आली आहे. पाटील-तलाठी तगादा लावतात. सावकार खळ्यांतच येऊन माल भरून नेतो! आपल्या हातांनीं पिकलेलें सारें सरकार, सावकार नेतात. पावसाच्या आरंभीं दोन महिने धान्य उधार आणून खावें लागतें, पुढें बीं विकत आणावें लागतें. दुकानदार बियांचा भाव वाढवतात !

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1 सोन्यामारुति 2 सोन्यामारुति 3 सोन्यामारुति 4 सोन्यामारुति 5 सोन्यामारुति 6 सोन्यामारुति 7 सोन्यामारुति 8 सोन्यामारुति 9 सोन्यामारुति 10 सोन्यामारुति 11 सोन्यामारुति 12 सोन्यामारुति 13 सोन्यामारुति 14 सोन्यामारुति 15 सोन्यामारुति 16 सोन्यामारुति 17 सोन्यामारुति 18 सोन्यामारुति 19 सोन्यामारुति 20 सोन्यामारुति 21 सोन्यामारुति 22 सोन्यामारुति 23 सोन्यामारुति 24 सोन्यामारुति 25 सोन्यामारुति 26 सोन्यामारुति 27 सोन्यामारुति 28 सोन्यामारुति 29 सोन्यामारुति 30 सोन्यामारुति 31 सोन्यामारुति 32 सोन्यामारुति 33 सोन्यामारुति 34 सोन्यामारुति 35 सोन्यामारुति 36 सोन्यामारुति 37 सोन्यामारुति 38 सोन्यामारुति 39 सोन्यामारुति 40 सोन्यामारुति 41 सोन्यामारुति 42 सोन्यामारुति 43 सोन्यामारुति 44 सोन्यामारुति 45 सोन्यामारुति 46 सोन्यामारुति 47 सोन्यामारुति 48 सोन्यामारुति 49 सोन्यामारुति 50 सोन्यामारुति 51 सोन्यामारुति 52 सोन्यामारुति 53 सोन्यामारुति 54 सोन्यामारुति 55 सोन्यामारुति 56 सोन्यामारुति 57 सोन्यामारुति 58 सोन्यामारुति 59 सोन्यामारुति 60 सोन्यामारुति 61 सोन्यामारुति 62 सोन्यामारुति 63 सोन्यामारुति 64 सोन्यामारुति 65 सोन्यामारुति 66 सोन्यामारुति 67 सोन्यामारुति 68 सोन्यामारुति 69 सोन्यामारुति 70 सोन्यामारुति 71 सोन्यामारुति 72 सोन्यामारुति 73 सोन्यामारुति 74 सोन्यामारुति 75 सोन्यामारुति 76 सोन्यामारुति 77 सोन्यामारुति 78 सोन्यामारुति 79 सोन्यामारुति 80 सोन्यामारुति 81 सोन्यामारुति 82 सोन्यामारुति 83 सोन्यामारुति 84 सोन्यामारुति 85 सोन्यामारुति 86 सोन्यामारुति 87 सोन्यामारुति 88 सोन्यामारुति 89 सोन्यामारुति 90 सोन्यामारुति 91 सोन्यामारुति 92 सोन्यामारुति 93 सोन्यामारुति 94 सोन्यामारुति 95 सोन्यामारुति 96 सोन्यामारुति 97 सोन्यामारुति 98 सोन्यामारुति 99 सोन्यामारुति 100 सोन्यामारुति 101 सोन्यामारुति 102 सोन्यामारुति 103 सोन्यामारुति 104 सोन्यामारुति 105 सोन्यामारुति 106 सोन्यामारुति 107 सोन्यामारुति 108 सोन्यामारुति 109 सोन्यामारुति 110 सोन्यामारुति 111 सोन्यामारुति 112 सोन्यामारुति 113 सोन्यामारुति 114 सोन्यामारुति 115 सोन्यामारुति 116 सोन्यामारुति 117 सोन्यामारुति 118 सोन्यामारुति 119 सोन्यामारुति 120 सोन्यामारुति 121 सोन्यामारुति 122