Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सोन्यामारुति 4

दुसरा : हा हिंदूंचा अपमान आहे. ही चीड येण्यासारखी गोष्ट आहे. याच्यासाठीं चळवळ झालीच पाहिजे. सर्व महाराष्ट्रभर चळवळ झाली पाहिजे. वाद्य वाजवून देत नाहीं म्हणजे काय ? गुलाम असलों म्हणून का धर्म-स्वातंत्र्यहि नको ? धर्म हा सर्वांना पाहिजे. स्वंतंत्राला पाहिजे, गुलामांना पाहिजे; रावाला पाहिजे, रंकाला पाहिजे; पुरुषाला पाहिजे, स्त्रीला पाहिजे; स्पृश्याला पाहिजे, अस्पृश्याला पाहिजे. धर्मांत नाहीं ढवळाढवळ होतां कामा.

पहिला : चळवळ सुरू झाली आहे. पुण्याचे लोक का स्वस्थ बसतील? पेशव्यांच्या राजधानींतील लोक का गप्प बसतील ? त्या धर्मभ्रष्ट गांधीच्या सत्याग्रहांत एक वेळ जाणार नाहींत, परंतु या धर्माच्या रणांत, ह्या घंटा वाजवण्याच्या थोर हक्काच्या युध्दांत, उड्या घेतल्याशिवाय ते कसे राहतील ? सत्याग्रह सुरू झाला आहे म्हणे.

दुसरा : शाबास! वाहवा रे पुणें. याला म्हणतात पुणें. मोठे मोठे सारे गेले का तुरुंगात ?

पहिला : अहो, मोठेमोठेच आधीं जात आहेत! हा लुंग्यासुंग्या बहुजन-समाजाचा सत्याग्रह नाहीं. हा विशेषेंकरून श्रेष्ठांचा-वरिष्ठांचा सत्याग्रह आहे. संस्कृतिसंरक्षकांचा हा सत्याग्रह आहे. संपादकांचा सत्याग्रह आहे. तेली-तांबोळी, साळी-कोळी-माळी अशांचा फारसा हा सत्याग्रह नाहीं.

दुसरा : गांधींच्या सत्याग्रहांत शेंबडीं पोरें जात असत. तसेच खेड्यांतील अडाणी शेतकरी, गिरण्यांतील मरतुकडे मजूर, तुकडेमोड्ये बेकार, यांची गर्दी त्यांत असे. सारी वानरसेना! अहो, त्या सत्याग्रहाचे हंसूं येई.

पहिला : पुण्याला या सत्याग्रहासाठीं शेंकडों लोक तुरुंगात गेले! हजारों जातील !!

दुसरा : शाबास !

पहिला : सर्व हिंदुस्थानांतून लोक तेथें जाणार आहेत !

दुसरा : अहो, एका पुण्यांतूनच दहा हजारांची मांड उठेल !

पहिला
: आळंदी, देहू, चिंचवड-सारीं देवस्थानें उठतील. लाखों वारकरी येतील. हजारों वारकरी येतील. आपल्याकडूनहि अंमळनेरचे सखाराम महाराज, कुकुरमुंड्याचे संतोजी महाराज, सोनगीरचे केशवदत्त महाराज ; सारे दिंडया घेऊन जाणार आहेत असें ऐकतो. आपला सनातनी खानदेश का मागें राहील ?

दुसरा
: नाशिकचे धष्टपुष्ट तेज:पुंज असे हजारों धर्मवीर गंगापुत्र पुण्यास जातील! सोलापूर पंढरपुराकडून सत्याग्रही पथकें येतील. सज्जन-गडाहून समर्थांचे ब्रह्मचारी येतील. औदुंबर, नरसोबाची वाडी, शेकडों पवित्र धर्मस्थानें! तेथील हजारों वीर पुण्याला आल्याशिवाय राहणार नाहींत. सोन्यमारुति पेटवणार, आग डोंब पेटवणार!

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1
सोन्यामारुति 2
सोन्यामारुति 3
सोन्यामारुति 4
सोन्यामारुति 5
सोन्यामारुति 6
सोन्यामारुति 7
सोन्यामारुति 8
सोन्यामारुति 9
सोन्यामारुति 10
सोन्यामारुति 11
सोन्यामारुति 12
सोन्यामारुति 13
सोन्यामारुति 14
सोन्यामारुति 15
सोन्यामारुति 16
सोन्यामारुति 17
सोन्यामारुति 18
सोन्यामारुति 19
सोन्यामारुति 20
सोन्यामारुति 21
सोन्यामारुति 22
सोन्यामारुति 23
सोन्यामारुति 24
सोन्यामारुति 25
सोन्यामारुति 26
सोन्यामारुति 27
सोन्यामारुति 28
सोन्यामारुति 29
सोन्यामारुति 30
सोन्यामारुति 31
सोन्यामारुति 32
सोन्यामारुति 33
सोन्यामारुति 34
सोन्यामारुति 35
सोन्यामारुति 36
सोन्यामारुति 37
सोन्यामारुति 38
सोन्यामारुति 39
सोन्यामारुति 40
सोन्यामारुति 41
सोन्यामारुति 42
सोन्यामारुति 43
सोन्यामारुति 44
सोन्यामारुति 45
सोन्यामारुति 46
सोन्यामारुति 47
सोन्यामारुति 48
सोन्यामारुति 49
सोन्यामारुति 50
सोन्यामारुति 51
सोन्यामारुति 52
सोन्यामारुति 53
सोन्यामारुति 54
सोन्यामारुति 55
सोन्यामारुति 56
सोन्यामारुति 57
सोन्यामारुति 58
सोन्यामारुति 59
सोन्यामारुति 60
सोन्यामारुति 61
सोन्यामारुति 62
सोन्यामारुति 63
सोन्यामारुति 64
सोन्यामारुति 65
सोन्यामारुति 66
सोन्यामारुति 67
सोन्यामारुति 68
सोन्यामारुति 69
सोन्यामारुति 70
सोन्यामारुति 71
सोन्यामारुति 72
सोन्यामारुति 73
सोन्यामारुति 74
सोन्यामारुति 75
सोन्यामारुति 76
सोन्यामारुति 77
सोन्यामारुति 78
सोन्यामारुति 79
सोन्यामारुति 80
सोन्यामारुति 81
सोन्यामारुति 82
सोन्यामारुति 83
सोन्यामारुति 84
सोन्यामारुति 85
सोन्यामारुति 86
सोन्यामारुति 87
सोन्यामारुति 88
सोन्यामारुति 89
सोन्यामारुति 90
सोन्यामारुति 91
सोन्यामारुति 92
सोन्यामारुति 93
सोन्यामारुति 94
सोन्यामारुति 95
सोन्यामारुति 96
सोन्यामारुति 97
सोन्यामारुति 98
सोन्यामारुति 99
सोन्यामारुति 100
सोन्यामारुति 101
सोन्यामारुति 102
सोन्यामारुति 103
सोन्यामारुति 104
सोन्यामारुति 105
सोन्यामारुति 106
सोन्यामारुति 107
सोन्यामारुति 108
सोन्यामारुति 109
सोन्यामारुति 110
सोन्यामारुति 111
सोन्यामारुति 112
सोन्यामारुति 113
सोन्यामारुति 114
सोन्यामारुति 115
सोन्यामारुति 116
सोन्यामारुति 117
सोन्यामारुति 118
सोन्यामारुति 119
सोन्यामारुति 120
सोन्यामारुति 121
सोन्यामारुति 122