Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सोन्यामारुति 40

वसंता : आमचे लोक दगडाधोंड्यांत देव मानतात ; झाडामाडांत देव पाहतात ; नदी पाहून दिडकी टाकतात. परंतु मानवांतील देव त्यांना कां दिसत नाहीं ? मानवांच्या डोळ्यांतील अश्रूंच्या करूणगंगा पाहून त्यांचे हात कां जोडले जात नाहींत?

वेदपुरूष : विचारशून्य आहेत म्हणून. ते चैतन्याला चिरडतात व जडाची पूजा करतात. तुमचे लोक पाश्चिमात्यांना जडवादी म्हणतात. परंतु अधिक जडवादी तुम्ही आहांत. तुम्हांला न बोलणारा, न रडणारा दगड प्रिय वाटतो. परंतु चिन्मय मनुष्य मातीमोल वाटतो!

वसंता : किती सुंदर विचार तुम्ही सांगितलांत! खरेंच. आम्हीच जडवादी आहोंत, जडपूजक आहोंत. चैतन्याची पूजा केव्हां सुरू होईल ?

वेदपुरूष : तुझ्यासारखें तरूण उठतील तेव्हां. तुम्ही मानव्याचा दीप पाजळा. चैतन्याची पूजा करा. या तेहतीस कोटीच नाहीं, शेंदोनशें कोटी मानवांची पूजा करावयास उठा.

वसंता : आपण या महारवाड्यांत जाऊं. विठींचे काम पाहूं.

वेदपुरूष : चल, सोन्यामारूति पहायला चल. सोन्यासारखीं माणसें कर्श धुळींत मिळवलीं जात आहेत तें पहा. आणि शेंकडों जिभांनीं तें जगाल गर्जूंन सांग.

वसंता : काय हीं घरें ? पावसांत हीं कशीं टिकत असतील ?

वेदपुरूष : तूं वडार लोक पाहिले आहेस ? पावसांत त्यांचीं घरें पाण्यावर तरंगूं लागतात! अरे, गरिबांना पावसांत झोंप नसते. आधार नसतो.

वसंता : सर्वत्र सामसूम आहे अगदीं. नाहीं म्हणायला दोन कुत्री भुंकत आहेत.

वेदपुरूष : तीं कुत्री रडत आहेत. त्यांच्या आवाजांत करूणा आहे. जगांत सहानभूति नाहीं असें देवाला तीं सांगत आहेत.

वसंता : हें कुत्रें कोठून आलें ? त्याच्या तोंडांत भाकर आहे.

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1
सोन्यामारुति 2
सोन्यामारुति 3
सोन्यामारुति 4
सोन्यामारुति 5
सोन्यामारुति 6
सोन्यामारुति 7
सोन्यामारुति 8
सोन्यामारुति 9
सोन्यामारुति 10
सोन्यामारुति 11
सोन्यामारुति 12
सोन्यामारुति 13
सोन्यामारुति 14
सोन्यामारुति 15
सोन्यामारुति 16
सोन्यामारुति 17
सोन्यामारुति 18
सोन्यामारुति 19
सोन्यामारुति 20
सोन्यामारुति 21
सोन्यामारुति 22
सोन्यामारुति 23
सोन्यामारुति 24
सोन्यामारुति 25
सोन्यामारुति 26
सोन्यामारुति 27
सोन्यामारुति 28
सोन्यामारुति 29
सोन्यामारुति 30
सोन्यामारुति 31
सोन्यामारुति 32
सोन्यामारुति 33
सोन्यामारुति 34
सोन्यामारुति 35
सोन्यामारुति 36
सोन्यामारुति 37
सोन्यामारुति 38
सोन्यामारुति 39
सोन्यामारुति 40
सोन्यामारुति 41
सोन्यामारुति 42
सोन्यामारुति 43
सोन्यामारुति 44
सोन्यामारुति 45
सोन्यामारुति 46
सोन्यामारुति 47
सोन्यामारुति 48
सोन्यामारुति 49
सोन्यामारुति 50
सोन्यामारुति 51
सोन्यामारुति 52
सोन्यामारुति 53
सोन्यामारुति 54
सोन्यामारुति 55
सोन्यामारुति 56
सोन्यामारुति 57
सोन्यामारुति 58
सोन्यामारुति 59
सोन्यामारुति 60
सोन्यामारुति 61
सोन्यामारुति 62
सोन्यामारुति 63
सोन्यामारुति 64
सोन्यामारुति 65
सोन्यामारुति 66
सोन्यामारुति 67
सोन्यामारुति 68
सोन्यामारुति 69
सोन्यामारुति 70
सोन्यामारुति 71
सोन्यामारुति 72
सोन्यामारुति 73
सोन्यामारुति 74
सोन्यामारुति 75
सोन्यामारुति 76
सोन्यामारुति 77
सोन्यामारुति 78
सोन्यामारुति 79
सोन्यामारुति 80
सोन्यामारुति 81
सोन्यामारुति 82
सोन्यामारुति 83
सोन्यामारुति 84
सोन्यामारुति 85
सोन्यामारुति 86
सोन्यामारुति 87
सोन्यामारुति 88
सोन्यामारुति 89
सोन्यामारुति 90
सोन्यामारुति 91
सोन्यामारुति 92
सोन्यामारुति 93
सोन्यामारुति 94
सोन्यामारुति 95
सोन्यामारुति 96
सोन्यामारुति 97
सोन्यामारुति 98
सोन्यामारुति 99
सोन्यामारुति 100
सोन्यामारुति 101
सोन्यामारुति 102
सोन्यामारुति 103
सोन्यामारुति 104
सोन्यामारुति 105
सोन्यामारुति 106
सोन्यामारुति 107
सोन्यामारुति 108
सोन्यामारुति 109
सोन्यामारुति 110
सोन्यामारुति 111
सोन्यामारुति 112
सोन्यामारुति 113
सोन्यामारुति 114
सोन्यामारुति 115
सोन्यामारुति 116
सोन्यामारुति 117
सोन्यामारुति 118
सोन्यामारुति 119
सोन्यामारुति 120
सोन्यामारुति 121
सोन्यामारुति 122