Get it on Google Play
Download on the App Store

बोलावणं आल्याशिवाय नाहीं !

'' .... सांगूं तरि आतां किती जणांना ? येतो तो हेंच विचारतो ! - असतील ! चार नाही छप्पन्न नोटिसा निघाल्या असतील ! करायचय काय मला त्यांच्याशीं ! जायचं असेल, त्यांनी जावं खुशाल ! मी थोडाच जातोंय तसा ! - अरे राह्यलं ! नाहीं, तर नाहीं ! इथं थोडंच माझं कांहीं अडलं आहे ! हपापलेली चार खतरुड पोरं गोळा करा, आणि हव्वं तें करा म्हणावं ! - नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा बट्याबोळ झाला, तर नांव कशाला ! - अबे जारे ! मोठा शाळेचा मला अभिमान सांगतो आहे ! आम्हांला तेवढा अभिमान असावा ! आणि शाळेला ? तिनं हवं तसं आम्हांला लाथाडावं होय ? - अलवत ! नाहींच भागायचं नुसल्या नोटिशीनं ! कांही थोडीथोडकी वर्ष नाहीं कामं केलेली मीं ! अन् तींही पुनः अशीं तशीं ? - चौथींत आल्याबरोबर धडाक्याला कॅन्यूटचं काम ! सारख्या टाळ्या ! तीच तर्‍हा दुसर्‍या वर्षी ! पुढें पांचवीत येतांच .... अश्वत्थाम्याचें काम ! जो कांहीं त्यांत माझा आवाज लागला, तसा अद्याप एकाचाहीं कोणाचा लागला असेल तर शपथ ! - दोन रे का ? पांचवीत तर ओळीनें तीन वर्ष कामं केली मीं ! अन् सहावीतली दोन ठाउकच आहेत तुम्हांला ! - नाहीं, संभाजीचं काम तें दुसर्‍या वर्षी ! वा ! त्या वर्षी तर किती जणांनीं आंत येऊन सांगितलं कीं, धंदेवाल्यापेक्षाही तुझं काम छान झालं ! ' - अरे त्या वर्षी तर स्पेशल पदक मिळालं मला ! - तेंच पुनः सातवींत आल्यावर ! पहिलंच अगदी सीझरचं काम - दुसर्‍याला चांगलं दिलेलं .... पण त्याचं काढून मुद्दाम मला दिलं ! नाटक पाह्यला कोणी युरोपियन आला होता, त्यानं काम पाहून .... विशेषतः ऍक्सेंटस ऐकून .... तोंडांत बोट घातलं म्हणतात ! - पुढं दुसर्‍या वर्षी ? - हां बरोबर ! धुंडिराजाचं काम ! - तेव्हां तर काय .... हंसता हंसतां पुरेवाट झाली लोकांची ! अन् सगळ्यांत बाबा कळस झाला गेल्या वर्षी ! - शॉयकॉलचं काम ! - पाहून लोक इतके चिडले कीं, एकनं तर चकचकीत घोंडा मारला स्टेजवर ! - तेव्हां बोला आतां ! इतका जिथं माझा अनुभव .... आणि दर्जा वाढलेला, तिथं असल्या फासक्याफुसक्या नोटिशीनं जायचं ! - साफ नाहीं यायचा तसा मी ! मास्तरचा जर येवढा ऐटा आहे .... सांगितलं ना ! मास्तरांवाच जर इतका तोरा आहे, तर साफ यायचा नाहीं मी बोलावणं आल्याशिवाय.... ''

३१ डिसेंबर १९२९

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?