Get it on Google Play
Download on the App Store

स्वर्गांतील आत्मे !

''.... कंटाळा आला बोवा आपल्याला इथचा ! - हो तर काय ? रोज तेंच, तेंच ! अग, काडीइतकासुद्धां फरक नसावा ? - उठल्या - बसल्या तें अमृत ढोसावें, आणि खुशाल टोळासारखें आपलें भटकावें ! कांहीं उद्योग दुसरा ? - छे छे छे !! ओकारी आली बोवा आपल्याला येथची ! असार ! असार आहे हा स्वर्ग निव्वळ ! - तेंच कीं ! सदा म्हणे आपला आनंद ! एक वृत्ति ! केव्हां संपते आहे कुणास ठाऊक ! - आतां थोडी कां वर्षे झाली असतील इथें येऊन ? - पण कांहीं आहे का फरक ? हें आपलें नंदनवन, होतें तस्सें आहे ! - नादीं लागलों ! आणि फुकट इथें तडफडायला आलों ! - चोर कुठले ! म्हणे ' स्वर्गात जा म्हणजे शांति मिळेल ! ' - वा ! काय छान शांति मिळते आहे इथें ! एकाला म्हणून करमत असेल तर शपथ ! नकोसें झालें आहे अगदीं ! - हें ग काय ? तूं तर रडायलाच लागलीस ! उगी ! - जाऊं ! लवकरच आपण मृत्युलोकांत जाऊं बरें ! तिथें मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील ! आणि मग काय महाराज ! - हंसली रे हंसली ! - अग तें कांहीं पुसूं नकोस ! देहलोकची मजा कांहीं और आहे ! घटकेंत आनंद आहे, तर घटकेंत दुःख आहे ! चाललें आहे ! शेंकडों वृत्तींत जिवाला बागडायला सांपडतें ! आणि हें कशामुळें ? - तर हें सगळें देहामुळें बरें का ! - आणि हो ! सगळेंच तिथें अस्थिर ! त्यामुळें अश्शी माणसाची परीक्षा होते कीं, ज्याचें नांव तें ! चांगला तावून सुलाखूनच निघतो ! उगीच नाहीं मृत्युलोक ! - बरें का ? - म्हटलें खरी मुक्ति तिथें आहे माझे बाई ! - नाहीं तर इथें ! पडा सदा आनंदांत कुजत ! - मृत्युलोकाशिवाय नाहींच तें ! सुख खरें तिथें ! अग आपलेंच काय, कंटाळा आला कीं देवसुद्धां जातो तिथें ! उगीच नाहीं अवतार घेत ! .... ''

७ नोव्हेंबर १९१३

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?