Get it on Google Play
Download on the App Store

पोरटें मुळावर आलें !

'' .... म्हणजे ! म्हणतेस तरी काय ? अग, काल त्याला दारावरुन जातांना मी पाहिला ! अन् तूं म्हणतेस, - चल ! कांही तरी सांगते आहेस झालं ! तसे नाही ग, तूं खोटं सांगतेस असं नाहीं म्हणत मी. पण बाई, असं होईल तरी कसं ? काल संध्याकाळी तो चांगला होता ना ? मग ? - आतां तूंच तर म्हणालीस, की ' रात्री चांगला जेवला, बाहेरुन फिरुन आला, ' अन् मग एकाएकींच हें ! - अरे ! अरे !! शेवटीं अफू खाऊन मेला ना ! - कसं तरणं ताठं पोर ! अन् काय ग त्याला आठवलं हें ! - खरंच का ? कुणाची चोरी केली होती त्यानं ? त्या .... यांची ? काय बाई तरी ! पण मी म्हणतें जीव द्यायचं काय येवढं - आपल्याला धरतील, अन् तुरुंगांत टाकतील म्हणून का? - काय - ही - संगत ! संगत भोंवली बरं त्याला ही ! - सदा मेली ती दारु अन् जुगार ! होतं नव्हतं त्याचं वाटोळं केलं, अन् शेवटीं बिचारा अस्सा जिवानिशीं गेला - अग, परवाच तो मरायचा ! या कोपर्‍यावरचीच आपल्या गोष्ट ! अंधारांत - रस्यांत आपला हा झिंगून पडलेला ! त्या टागेवाल्याची नजर केली, म्हणून बरं ! नाही तर त्याच वेळेला याचं भरायचं ! बिचारी बायको मात्र फुक्कट बुडाली हो ! - सारखी रडते आहे ना ! - रडेल नाहीं तर काय करील ? - कोणाचा आधार का आहे तिला आतां ! सांग ! - बरं, का ग, तिला कांही पोरबाळ ? - कांही नाही ना ? - बरं, कांहीं दिवसबिवस तरी ? - लोटले आहेत ना पांचसहा  महिने ? - असो चला ! तेवढाच तिच्या जिवाला आधार ! - हो, तें तर खरंच ग ! आलं पोरटं तें बापाच्याच मुळावर ! .... ''
२९ मे १९१२

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?