Get it on Google Play
Download on the App Store

नासलेलें संत्रें

''.... ठरलेलेंच ! आम्ही असेंच हाल हाल होऊन - तडफडून मरायचे ! - छान झालें ! असेंच पाहिजे ! काय जोरानें त्यानें मला भिरकावून दिलें पण ! रागानें लाल झाला होता ! - अहो बरोबरच आहे ! नासलेलीं संत्रीं ! चांगल्या संत्र्यांमध्यें पाहिजे आहेत कशाला ? त्यांना असेंच झुगारुन दिलें पाहिजे ! चांगली तुडवून - डोक्यांत व अंगांत खिळे ठोकून - जाळून पोळून मारलीं पाहिजेत ! नाही तर ? अहो ही जिवंत विचारांनीं सडून - भणाणून गेलेलीं संत्री ! - जुलमी जगाला गोड मानून त्यांत आंबून - कुजून मेलेल्या संत्र्यांना आपल्यासारखींच स्वतंत्र व ईश्वरी विचारांनीं जिवंत करुन - त्यांना नाचायला लावतील ! आणि मग ? जिकडे तिकडे प्रलय होईल ! जिवंत हदयांना पिळून काढून त्यावर मस्त होऊन बसलेलें हें जुलमी जग पार उलथून पडेल ! आणि सर्वत्र ईश्वरी साम्राज्य सुरु होईल ! - पाहिलेंत ? तीं मार्केटांत डौलानें बसलेली संत्रीं माझ्याकडे पाहून कशी हंसत आहेत ! - हंसा ! खुशाल हंसा ! - मी दुर्दैवी ? तें काय म्हणून ? आणी तुम्ही काय असे मोठे सुदैवी लागून गेलां आहांत ?अरे ! जगांत येऊन फार झालें तर सात नाहीं तर आठ जिवांना तुम्ही पोसाल ! पण मी येथें एकटा हजारों जिवांना पोशीत आहें ! तुम्ही जगाचे गुलाम ! तुमच्यासारखीं लक्षावधि संत्रीं जग तेव्हांच गट्ट करुन टाकील ! - छाती नाहीं ! माझ्याकडे आ वासण्याची जगाची छाती नाहीं ! माझा प्रत्येक दाणा ईश्वरी तेजानें वळवळणारा आहे ! तुमचे सगळे दाणे - सर्व विचार - एकसारखे येथून तेथून पार मेलेले ! - ' नासलेली संत्नीं ! ' थांबा ! आम्ही नासलेलीं संत्रींच जुलमी जगाच्या पोटांत शिरुन सर्व जग लवकरच पेटवून देऊं ! - चढवा ! प्रेमानें नासलेल्या भगवान् खाइस्टला एक - नाही पन्नास वेळां क्रूसावर चढवा ! तुमचीं बिंगें बाहेर फोडणार्‍या महाकवि डँटीला खुशाल हद्दपार करा ! वाटेल तसा सैतानी धिंगाणा घाला ! पण ध्यानांत ठेवा ! लवकरच सर्व जगाला स्वातंत्र्याची - प्रेमाची - आग ! आग लागेल !! .... ''

४ सप्टेंबर १९१३

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?