Get it on Google Play
Download on the App Store

म्याऊं - म्याऊं - म्याऊं !

'' ..... देवा ! माझीं पिलें भुकेनें कशीं व्याकूळ रे झालीं आहेत ! तीन वाजून गेले, पण अजून यांच्या पोटांत, घासभर कीं रे अन्न केलें नाहीं ! बाळांनो ! उगी, नका रडूं ! मी पुनः खालीं जातें - अगदी हलूं नका. या गलथ्यांतच अमळ एकमेकांशी खेळत बसा ! - स्वयंपाकघरांत जातें, आणि कांहीं उष्टें अन्न पडलें असेल, तें माझ्या बाळांकरितां घेऊन लवकर येतें ! जाऊं ? - आज घरांत येवढें काय आहे ? काय सांगूं तुम्हांला ! मुलांनो, आज किं नाहीं माझा वाढदिवस - माझ्या पूर्वजन्मीच्या मनुष्यदेहाचें वर्षश्राद्ध आहे ! खरें म्हटलें, तर हें माझेंच घर - हीं माझींच मुलें, - पण या घरांतल्या मुलांना काय ठाऊक कीं, मी त्यांचीच आई आहें म्हणून ! त्यांना वाटतें - त्यांनाच काय ? - सर्व जगाला वाटतें की, आपले सगळे पूर्वज स्वर्गाला जातात म्हणून ! पण किती तरी ठिकाणी, मनुष्यदेहाचें जीर्ण वस्त्र फेंकून देऊन पशुपक्ष्यांचें कातडें अंगावर घेऊन आम्ही ! - आम्ही आपल्या मुलांलेंकरांभोंवती प्रेमानें वावरतों, त्यांची सेवा करतों - आणि उलट त्यांच्या लाथाबुक्क्यांचे - चाबकांचे - तडाखे सोशीत धाय मोकलून रडत कीं रे असतों ! पण बाळांनो, जगाला निव्वळ देह - कातडें - माती ! - प्रिय आहे ! आत्म्यावर जगाचें खरें प्रेमच नाहीं ! जोंपर्यत मी मनुष्यदेहानें नटलें होते, तोंपर्यंत ही घरांतली माझींच मुलेंलेंकरे कशीं मजवर प्रेम करीत होतीं ! पण मी मांजर होऊन घरांत फिरुं लागल्यापासून, मला कोणी जवळसुद्धां उभें राहू देत नाहीं ! देवा ! आज माझाच वाढदिवस, आणि मलाच का रे अन्न - पानांतलें घासभर उष्टें अन्नसुद्धां मिळूं नये ! पण या घरांतल्या मुलांना तरी काय ठाऊक कीं, मी त्याचीच आई आहें ? तसें असतें तर मघाशीं मी नुसती स्वयंपाकघरांत डोकावलें मात्र, तोंच ' रांडे ! नीघ ! ' असें म्हणून माझ्या वेणूनें - प्रत्यक्ष माझ्या लेंकीनें ! - ताडकन् माझ्या डोक्यांत लाटणें फेंकून कशाला बरें मारलें असतें ! - बाळांनो ! नका रडूं ! मी आतां खाली जाऊन येतें !..... ''

८ डिसेंबर १९११

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?