Get it on Google Play
Download on the App Store

एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे !

'' .... कान फुटले आहेत का रे तुमचे ? मघांपासून सारख्या मी इकडे हाका मारतों आहे, कुठें होतास रे तूं ? घरांत काय झोपा घेतां सगळें ? जा, आतांच्या आतां गाडी जोडून तयार ठेवायला सांग ! पेन्शन् आणायला जायचें आहे, लवकर मला गेलें पाहिजे ! - हें काय ? आपण कां उठलांत ? अहो, दोघे आपण बरोबरच गाडींत जाऊं. तुम्हांला घरी सोडतों आणि मग मी - आहो कंशाचा राग अन् काय ! चालायचेंच ! भाऊसाहेब, आमचें आपलें हें असें आहे. बोलूनचालून कच्च्या दिलाची माणसें आम्ही ! कितीसा टिकाव लागणार ! झालें, केली बडबड ! '' पुनर्विवाह करावा, पुनर्विवाह करावा ! '' अशी हवी तितकी वटवट केली ! मोठ्या दिमाखानें मारे लांबलचक व्याख्यानेंसुद्धा झोडलीं ! पण शेवटीं ? स्वतः वर पाळी आली, तेव्हां घातलें शेपूट ! आणि केलें काय ? तर बारातेरा वर्षाच्या पोरीशीं लग्न ! - नाहीं, तसें नाहीं ! मी आपला स्पष्ट बोलणारा माणूस आहे ! अहो, काय वाटेलतें करा, आमच्यासारखीं ही असायचींच ! आणि खरें आहे ! बोलल्याप्रमाणें सगळेच वागायला लागले, तर उद्यां जगाचा कारभारच आटपेल ! नाहीं का ? ह्यः ह्यः ! - गाडी तयार आहे ? - चला ! - अरे थांब, हा टाइम्सचा अंक, आणि तो स्पेन्सरचा व्हॉल्यूम, हे गाडींत नेऊन ठेव - बाकी भाऊसाहेब, तुम्ही कांही म्हणा, खरें आणि स्पष्ट बोलावयाचें, म्हणजे मीं स्वतः पुनर्विवाह केला नाही म्हणून काय झालें ? काय तेवढें बिघडलें ? अहो, आमच्यापैकी लवकरच कोणी तरी - काय, आलें का लक्ष्यांत ? म्हणजे तुमच्याकरितां सामुग्री तयार करुन ठेवलीच आहे ! अहो तसें नाही असें ! एका दृष्टीनें मी तुमच्या कार्याला साहाय्यच केलें आहे ! हीः हीः हीः - चला ! .... ''

२२ मे १९१३

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?