Get it on Google Play
Download on the App Store

मग तो दिवा कोणता ?

'' .... सखे ! दुसरा दिवा आणतेस ना ? - अरेरे ! या माझ्या दिव्यांत कितीतरी किड्यांचा बुजबुजाट झाला आहे ! माझ्या तेलाची घाण झाली ! - घाण झाली !! - काय ? काजळाचा बर्फ पडत आहे ! - सखे ! अग सखे ! येतेस ना लवकर ? - अग, माझ्या खोलींत जिकडेतिकडे हा दिवा काजळ उधळीत आहे ! अरे दिव्या ! माझ्यावर जितका काजळाचा वर्षाव करावयाचा असेल तितका कर ! - पण माझ्या या शेक्सपीअरवर व ब्राउनिंगवर एक कणसुद्धां टाकूं नकोस ! - हाय ! हें तेल किती स्वच्छ होतें ! पण आतां ! - हे किडे उसळून उडया मारायला लागले म्हणजे हेंच तेल, निळें, पिंवळें, हिरवें, तांबडे लाल ! - पहा, पहा ! कसें आतां काळें झालें आहे तें ! - दिवा भडकला ! - काय म्हटलेंस ? दुसरा दिवा नाहीं ? तुला कोणीं धरुन ठेवलें आहे ! - हाय ! माझ्या तुळईला आग लागली ! - माझें घर पेटलें ! - धांवा ! धांवा !! मी भाजून मेलों ! मला कोणी तरी वांचवा हो ! काय हा आगीचा डोंब ! देवा ! देवा !! - हं ! येथें तर कांहीं नाहीं ! शांततेच्या मांडीवर काळोख तर स्वस्थ घोरत आहे ! आग नाहीं, कांही नाहीं ! मग, तो दिवा कोणता बरें भडकला होता ? .... ''

९ नोव्हेंबर १९११

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?