Get it on Google Play
Download on the App Store

कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ?

'' .... थांब ! अशानें थोडाच तूं ताळ्यावर येणार आहेस ! नुसत्या छडीनें नाहीं भागायचें - चांगला या चाबकानेंच तुला सडकला पाहिजे ! - चूप ! खबरदार ओरडशील तर ! आणलीस तापवलेली पळी ? ठीक. आण ती इकडे ! धर याला नीट, - अस्सा ! चांगला चरचरुन डाग बसला तोंडाला ! - रडूं दे, रडूं दे लागेल तितका ! काय ग, या त्रिंब्याला अक्कल तरी केव्हां येणार ? आतां का हा लहान आहे ? चांगला सहा वर्षाचा घोडमा झाला आहे ! पण अजून कसें तें व्यवहारज्ञान नाहीं ! - नाहीं पण मी म्हणतों, कांहीं जरुर पडली होती मध्यें बोलण्याची याला ? मी इकडे गणपतरावांना सांगतों आहे कीं, तुमची दहा रुपयांची नोट पडलेली इथें कांहीं कोणाला सांपडली नाहीं म्हणून ! पण इतक्यांत आमचे हे दिवटे चिरंजीव आले ना ! आल्याबरोबर यानें त्या गृहस्थाला सांगितलें कीं, - तरी मी इकडे चांगला डोळ्यांनी दाबतों आहें ! - पण या गाढवाचें लक्ष असेल तर ! - म्हणे ' तुमच्या खिशांतून काल कागद पडला होता, तो किनई मी बाबांच्याजवळ नेऊन दिला ' - चूप बैस ! खोटें बोलतोस आणखी ? असें नाहीं तूं त्यांना म्हणालास ? - अग यानें सांगितल्याबरोबर, माझ्या जीवाची कोण इकडे त्रेधा ! मग कांहीं तरी आठवल्यासारखे केलें, मुद्दाम कागदपत्रांची दहापांच पुडकीं उलथी पालथी केलीं, अन् खिशांत असलेली नोट हळूच कशी तरी त्या गणपतरावांना काढून दिली ! - असा संताप आला होता त्या वेळेला या कार्ट्याचा ! - पण त्यांच्या देखत ' नेहमीं अशींच मला शहाणपणानें आठवण करीत जा बरें बाळ ! ' असें म्हणून ते जाईपर्यंत या त्रिंब्याची मला वरचेवर पाठ थोपटावी लागली ! कशी लक्ष्मी चांगली घरांत चालून आली होती ! - पण या कार्ट्यापायीं; - अरे कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ! - तें कांही नाहीं ! या पोरट्यांना उठतां बसतां नेहमीं सडकलेंच पाहिजे ! त्याशिवाय नाहीं यांना जगांतलें ज्ञान यायचें ! - स्वयंपाक झाला आहे म्हणतेस ? चला तर घ्या आटपून. चंडिकेश्वराच्या देवळांत लवकर मला गेलेंच पाहिजे ! आजपासून तिथें प्रख्यात काशीकरशास्त्री श्रीमदभगवद्गीतेवर पुराण सांगायला सुरुवात करणार आहेत ! चला तर लवकर ! - ' त्रिंब्या, थांबलें कीं नाही तुझें अजून रडणें ? का पाहिजे आहेत तडाखे आणखी ? '.... ''

१८ नोव्हेंबर १९११

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?