Get it on Google Play
Download on the App Store

पुनवेची शारद रात

झिंगत आला तारानाथ.

आल्या मुखरिणि या बाहेर,

चंद्राभोवति धरिती फेर.

फेर धरति या गाउनि आज,

लखलख चमकति लेउनि साज,

अंगणि भरला वरि आनंद,

लीला मचली अंदाधुंद,

गवळणि जमल्या कुरणीं आज,

मुरली घुमवा या महाराज !

शरदाचा हा मादक काळ,

अंगी आला, या गोपाळ,

गाणीं गाऊं घेउनि फेर,

मोरमुगुट शिरिं, या बाहेर.

धवल पिठापरि यमुना-तीर.

लहरी नाचुनि गाई नीर,

खिदळे वारा हा कुंजांत,

डुलती राया, गाई आंत;

विखरी परिमळ हा कुरणांत

मद संचरला दाहि दिशांत.

चंचळ चरणीं नाचूं आज,

मुरली घुमवा या महाराज !

संग्रह २

भा. रा. तांबे
Chapters
मातृभूमीप्रत आलें तुझ्या रे दारीं नृपा रे चेटक्या ! प्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं ? रे मानसहंसा ! सामाजिक पाश कोठे शांति, तुझा निवास ? शांतिनिवास चल जळो ज्ञानविज्ञान गड्या ! जीवसंयोग प्रणयप्रभा कुणी कोडें माझें उकलिल का ? जीवनसंगीत मग विसर हवा तर हा क्षण गे ! लोकमान्यांस घट भरे प्रवाहीं बुडबुडुनी बघुनि तया मज होय कसेंसें ! गौप्यमान भयचकित नमावें तुज रमणी ! प्रेमरत्‍नास तें दूध तुझ्या त्या घटांतलें नववधू प्रिया, मी पावलोपावलीं साउलि ही ! क्षण सुवर्णकण झाले रमणा ! घन तमीं शुक्र बघ राज्य करी ! सोन्याची घेउनि करिं झारी आह्रानशृंग मंदिरीं मना, तव गान भरे या प्रकाशशिखरीं रे अजात अज्ञात सखे जन ! गोंधळाचें घर या वेळीं माझ्या रे रमणा ! गे शपथ तुझी ! नटेश्वराची आरती घातली एकदा अतां उडी ! रुद्रास आवाहन उद्यांची गति पोशाख नवनवा मला दिला ! महा-प्रस्थान घाबरूं नको, बावरूं नको ! आलों, थांबव शिंग ! जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !' निरोप घेतांना मरणांत खरोखर जग जगतें ! उदार चंद्रा ! गाडी बदलली ! किति महामूर्ख तूं शहाजहां ! जीवितसाफल्य आज तो कुठे जिवाचा चोर ? स्वारी कशी येईल ? वैरिण झाली नदी ! निजल्या तान्ह्यावरी कळा ज्या लागल्या जीवा जन म्हणती सांवळी ! फेरीवाला पक्षि पिंजर्‍यांतुनी उडाला ! दृष्ट हिला लागली ! विरहांतील चित्तरंजन तुझे लोचन घट भरा शिगोशिग निष्ठुर किति पुरुषांची जात ! घट तिचा रिकामा पुनवेची शारद रात कवणे मुलखा जाशी ?