धडपडणारा श्याम 81
शिवराम व मी शाळेत गेलो. शाळेची घंटा व्हायला अद्याप अवकाश होता. मी सहाव्या यत्तेत गेलो. सारी मुले माझ्याभोवती जमली. एका मित्राने कोटावर सोनचाफ्याचे फूल लावले. कोटावर फुले लावून एका मास्तरांची आपण मागे कशी गंमत केली होती, ते आम्हां सर्वांना आठवून, आम्ही मोठयाने हसलो.
''श्याम, औंधला कोणाच्या पिशव्यांना गाठी नाही ना बांधल्यास?'' एका मित्राने विचारले.
''औंधला श्याम अगदी गरीब पारवा झाला होता. गरीब गाय झाला होता,'' मी म्हटले.
''तू असा कसा मधेच आलास?'' परशुरामने विचारले.
''तिथे प्लेग झाला, म्हणून शाळा बंद,''मी म्हटले.
''इथे दापोलीला कधी प्लेग येत नाही. इथे ठरलेल्या सुट्टयाा, देशावर प्लेगचीही सुट्टी मिळते,'' कृष्णा म्हणाला.
''तुझा भाऊ प्लेगनी गेला ना रे?'' जगन्नााथने विचारले.
''हो आणि रामचा भाऊही गेला,'' मी म्हटले.
''तोही प्लेगनेच का?''
''नाही, विषमाने आणि आपल्या शंकरला रे काय झालं?'' मी आमच्या जुन्या वर्गमित्राबद्दल दु:खाने विचारले.
''त्याला उदर झाला. उदराचे रोगी पावसाळयात दगावायचेच. काही एक कल्पना नव्हती. वर्गात त्याच्या शिवाय आम्हांला सुनं वाटतं. भूमितीच्या तासाला तो मास्तरांना भंडावून सोडायचा,'' केशव म्हणाला.
इतक्यात घंटा घाली. पहिली घंटा होताच वर्गात येणारे ते मास्तर, त्यांचाच सहावीवर पहिला तास होता. मी परशुरामच्या जवळ बसलो होतो. वर्गात मास्तर आले. आज दुसरी घंटा झाली नाही, तरी सारी मुले वर्गात कशी, ह्याचे त्यांना आ९चर्य वाटले. मुलांमध्ये मंद हास्याच्या झुळका सुटल्या. मास्तरांची तीक्ष्ण नजर चौफेर फिरली. त्यांची माझी दृष्टादृष्ट झाली. त्यांना जुना शिष्य पाहून आनंद झाला. ते एकदम उठले. त्यांनी फळयावर एक श्लोक लिहिला. तो संस्कृत श्लोक होता. तो श्लोक त्यांनी का लिहिला, ते माझ्या पटकन ध्यानात आले. मी हसू लागलो.
''काय श्याम, हसूसं येत आहे? श्लोक समजला वाटतं?'' त्यांनी विचारले.
''हो,'' मी म्हटले.
''कुठला आहे हा श्लोक?'' त्यांनी प्रश्न केला.
''मेघदूततातला,'' मी म्हटले.
त्या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे:
'आपल्या प्रचंड वृष्टीने पर्वतांवरचे वर्णवे विझवणारा जो तू, त्या तुला प्रवासात शीण आलंला पाहून, तो अनेक शिखरांचा आम्रकूट पर्वत, आपल्या सुंदर डोक्यावर तुला घेईल; कारण पूर्वीच्या प्रेमळ स्मृतींच्या आशेने आलेल्या आपल्या मित्राला पाहून क्षुद्र मनुष्यही विन्मुख होणार नाही. मग जे मनाने थोर आहेत, त्यांच्याबाद्दल काय सांगावे?'
मी पुढे म्हटले, ''त्या श्लोकातले शेवटचे दोन चरण त्या दिवसापासून माझ्या मनात अमर झाले आहेत. ज्ञान हे प्रसंगाने ठसतं. अनुभवाने सिध्द होतं. जीवनात मुरतं.''
''म्हणाना ते दोन चरण,'' आश्रमातला वासुदेव म्हणाला.
''मी सर्वच श्लोक आठवतो आहे; परंतु सर्व कही आठवत नाही,'' मी म्हणालो.
''जे चरण अमर आहेत, तेच आहेत, तेच म्हणा,'' गोविंदा म्हणाला.