धडपडणारा श्याम 55
मावशी, एखादी शिकवणी कर नि पाठव ना मला पाच रुपये. मला रुपये मला पुरे होतील. तेवढयात मी स्वर्ग निर्माण करीन. तुझा श्याम आनंदाने राहील. गरिबीत राहाण्याची त्याला सवय आहे. चैनीची मला चटक नाही, ऐटीचा मला वीट आहे. तुला माहितच आहे. श्याम साधा आहे.
सदानंदाची मला आठवण येते. त्याचा अभ्यास चांगलाच चालला असेल. सुंदर सुंदर पुस्तकं तू त्याला देत असशील. तो कालव्याच्या काठाने फिरायला जात असेल. मजा करीत असेल. तू मागे एकदा लिहिलं होतंस, की सदानंद रोज डायरी लिहितो. डायरीत काय काय जिहितो, ते पाहायची इच्छा आहे; परंतु मी तुला भेटेन, तेव्हा ती इच्छा सफळ होईल. मी शिकवलेली स्तोत्रं नि श्लोक तो म्हणतो का? तिथे नवीन सुंदर गाणी तो शिकला असेल नि कोकणातल्या विहिरीच्या काठी बसून शिकवलेली ती स्तोत्रं तो विसरला असेल. स्तोत्रं तो विसरला असेल. स्तोत्रं व श्लोक म्हणावं विसर; परंतु अण्णाला विसरु नकोस! अण्णाची आठवण आहे का त्याच्या डायरीत? त्याच्या डायरीतले काही उतारे पाठव ना मला. ते वाचून खूप आंनद होईल.
आम्हा सर्व भावांत सदानंद हुषार होईल, नाही? आम्हा सर्वापेक्षा तो सुंदर आहे, गोरागोमटा आहे. त्याचे ते चिमणे दात किती गोड दिसतात, नाही? कसा हसतो, कसा बोलतो. सदांनद नाव त्याला खरोखरच साजतं आता मी झोपतो. तुमची सर्वांची आठवण करीत करीत झोपतो, तुम्ही झोपला असाल. घरी आईला मात्र झोप लागली नसेल. ती ह्या श्यामची आठवण करीतअसेल नि म्हणत असेल, 'देवा, श्यामला माझ्या सांभाळ हो,' नाही?
तुझा,
श्याम
मावशीला लिहिलेले पत्र सकाळी मी पेटीत टाकले. दोन दिवसांनी उत्तर आले. किती करुण ते उत्तर होते!
सप्रेम आशीर्वाद.
श्याम, तुझं पत्र वाचून वाटलं ते कसं लिहू? पत्र वाचता वाचता मला रडू आले. सदानंद विचारु लागला, ' मावशी काय ग आहे पत्रात?' मला बोलवेना. तोही रडू लागला. मी त्याला म्हटलं, ' तुला वाचता येतं? हे अण्णाचं पत्र वाच.'
त्यानं वाचलं. ते पत्र हातात घेऊन तो गेला. कुठे गेला? तो कालव्याच्या काठील जाऊन बसला. पाण्यानं भरलेल्या त्या कालव्याच्या काठी तो रडत होता. मी त्याला म्हटलं, 'तुला वाचता येतंत्र हे आण्णाचं पत्र पाचत्र' त्यानं वाचलं ते पत्र हातात घेऊन तो गेला. कुठे गेला तो कालव्याच्या काठी जाऊन बसला. पाण्यानं भरलेल्या त्या कालव्याच्या काठी तो रडत होता. मी त्याला खोलीत घेऊन आल्ये, 'उगी रडूं नको,' मी त्याला म्हटलं.
''मावशी, तू मला दूध देतेस, ते आजपासून बंद कर, ते पैसे अण्णाला पाठवता येतील,'' सदानंद म्हणाला.