Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

लावी पक्षीण व तिची पिले

एका शेतात एक लावी पक्षीण आपल्या पिलांसह राहात होती. जेव्हा ते शेत पिकले, तेव्हा तिला काळजी पडली की, आपल्या पिलांना पंख फुटून ती चांगली उडू लागण्याच्या पूर्वी जर शेताचा मालक शेत कापायला आला तर कसे होईल ? तेव्हापासून चारा आणण्यासाठी नेहमी बाहेर जाताना, माझ्या मागं इथं येऊन कोणी काही बोललं तर ते सगळं मी घरी आल्यावर मला सांगा.' असं आपल्या पिलांना सांगून ती जाऊ लागली. एके दिवशी शेताचा मालक शेतावर येऊन आपल्या मुलाला म्हणाला, 'मुला, हे शेत आता कापायला हवं असं मला वाटतं तर तू उद्या सकाळी आपल्या मित्रांना शेत कापण्यासाठी मदत करायची विनंती कर.' संध्याकाळी लावी पक्षीण घरी येताच पिलांनी ती हकीगत तिला कळविली आणि तिच्याभोवती किलबिल करून ती म्हणाली, 'आई, आता आम्हाला इथून लवकर दुसर्‍या ठिकाणी घेऊन जा.' पक्षीण म्हणाली, 'मुलांनो, काही काळजी करू नका, कारण शेताचा मालक आपले मित्र शेत कापायला येतील या विश्वासावर राहिला आहे. यावरून उद्या कापणी होत नाही याबद्दल खात्री असू द्या.' द्सरे दिवशी पक्षीण बाहेर गेल्यावर शेताचा मालक पुन्हा शेतावर आला व मित्रांची वाट पाहात बसला. परंतु बराच वेळ गेला तरी एकही माणूस आला नाही, मग उन्ह होत आले तेव्हा तो आपल्या मुलाला म्हणाला, 'मुला, मित्र, शेजारीपाजारी यांच्यावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, तर तू आता आपल्या नातेवाईकांकडे जा नि शेताच्या कापणीला मदत करण्याची त्यांना विनंती कर.' संध्याकाळी पक्षीण घरी आली तेव्हा पिलांनी ते बोलणे तिला कळविले, व तेथून दुसरीकडे जाण्याचा आग्रह केला. तेव्हा पक्षीण त्यांना म्हणाली, 'मुलांनो, तुम्ही मला जे सांगता त्यावरून भिण्याचं काही कारण नाही. नातेवाईक येऊन यांचं शेत कापणं शक्यच नाही.' दुसर्‍या दिवशी शेताचा मालक येऊन नातेवाईकांची वाट पाहत बसला, परंतु कोणीही आले नाही. मग तो आपल्या मुलाला म्हणाला, 'मुला, काही हरकत नाही. या लोकांची मिजास तरी कशाला चालू द्यावी ? आपणच उद्या येऊन हे शेत कापून टाकू. तू आज दोन कोयत्यांना चांगली धार करून ठेव म्हणजे झालं.' रात्री पक्षीण आल्यावर पिलांनी तिला सर्व सांगितले तेव्हा ती म्हणाली, मुलांनो, आता इथे राहण्यात काही अर्थ नाही कारण, जो माणूस आपलं काम आपण स्वतः करीन असं म्हणाला, तो ते काम केल्याशिवाय राहणार नाही !' इतके बोलून तिने आपली पिलं तेथून काढून दुसर्‍या एका सुरक्षित जागी नेऊन ठेवली. दुसरे दिवशी शेताचा मालक व त्याचा मुलगा दोघांनी येऊन शेताच्या कापणीला सुरुवात केली.

तात्पर्य

- जे काम स्वतःच्या हातून होण्यासारखे असेल, त्या कामी दुसर्‍याच्या मदतीवर अवलंबून राहू नये.

इसापनीती कथा २५१ ते ३००

इसाप
Chapters
रानटी व गावठी हंस
आजारी गाढवी व भुकेले लांडगे
जीभ
कोल्हा आणि लांडगा
पावसाचा थेंब
कस्तुरी मृग
कोल्हा आणि काटेझाड
कुत्रा व बोकड
माणूस व सिंह
कानस व साप
दोन उंदीर
कैदी झालेला लांडगा
लांडगा आणि गाढव
लांडगा आणि सिंह
कोंबडी आणि साळुंकी
वानर आणि सुतार
करडू आणि लांडगा
खेचर
कुत्रा आणि कोंबडी
लांडगे आणि बोकड
माणूस आणि मुंगूस
म्हातारा कुत्रा
म्हातारा आणि त्याचे मुलगे
मुंगी आणि माशी
पशू, पक्षी आणि वटवाघूळ
साप आणि माणूस
साळू आणि लांडगा
ससा आणि कासव
ससे आणि बेडूक
साळुंकी आणि इतर पक्षी
सिंह आणि रानडुक्कर
सिंह आणि हरिण
वानर व अग्नी
काळा माणूस
उंट व त्याचा मालक
उंट आणि माकड
उंदीर आणि बोका
टोळ आणि गाढव
सिंह व त्याचे तीन प्रधान
सिंह, गाढव आणि कोल्हा
सिंह, अस्वल आणि कोल्हा
शेतकरी आणि चिमण्या
मुलगा आणि नाकतोडा
मोठे मासे व लहान मासे
मोर आणि कावळा
म्हातारी आणि तिची मेंढी
लावी पक्षीण व तिची पिले
कुत्रा आणि त्याचा मालक
कोंबडी आणि कोल्हा