Get it on Google Play
Download on the App Store

दोन उंदीर

एक म्हातारा उंदीर फार लबाड होता. त्याने एके दिवशी एका चापात खवा घालून ठेवलेला पाहिला. खवा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले, परंतु तो खाण्यासाठी आत तोंड घालावे तर चाप बसून जीव जाणार हे माहीत असल्यामुळे त्याने एक युक्ती केली. एक तरुण उंदीर तिकडून जात होता, त्याला हाक मारून म्हणाला, 'अरे मित्रा, हा खवा पाहिलास का किती सुंदर आहे तो ! मी नुकताच पोटभर जेवलो असल्यामुळे मला आता भूक नाही पण तुला भूक लागली असल्यास हा खवा तू खाऊन टाक.' या त्याच्या कपटी भाषणावर विश्वास ठेवून त्या तरुण उंदराने तो खवा खाण्यासाठी लगेच चापात तोंड घालताच तो चाप पटकन मिटला गेला आणि तो बिचारा उंदीर त्यात सापडून मेला. आता चापाचे भय उरले नाही असे पाहताच तो म्हातारा उंदीर पुढे झाला व त्याने सर्व खवा खाऊन टाकला.

तात्पर्य

- लबाड लोकांच्या लबाडीस बळी पडून स्वतःचा नाश करून घेणारे मूर्ख लोक जगात फार असतात.

इसापनीती कथा २५१ ते ३००

इसाप
Chapters
रानटी व गावठी हंस आजारी गाढवी व भुकेले लांडगे जीभ कोल्हा आणि लांडगा पावसाचा थेंब कस्तुरी मृग कोल्हा आणि काटेझाड कुत्रा व बोकड माणूस व सिंह कानस व साप दोन उंदीर कैदी झालेला लांडगा लांडगा आणि गाढव लांडगा आणि सिंह कोंबडी आणि साळुंकी वानर आणि सुतार करडू आणि लांडगा खेचर कुत्रा आणि कोंबडी लांडगे आणि बोकड माणूस आणि मुंगूस म्हातारा कुत्रा म्हातारा आणि त्याचे मुलगे मुंगी आणि माशी पशू, पक्षी आणि वटवाघूळ साप आणि माणूस साळू आणि लांडगा ससा आणि कासव ससे आणि बेडूक साळुंकी आणि इतर पक्षी सिंह आणि रानडुक्कर सिंह आणि हरिण वानर व अग्नी काळा माणूस उंट व त्याचा मालक उंट आणि माकड उंदीर आणि बोका टोळ आणि गाढव सिंह व त्याचे तीन प्रधान सिंह, गाढव आणि कोल्हा सिंह, अस्वल आणि कोल्हा शेतकरी आणि चिमण्या मुलगा आणि नाकतोडा मोठे मासे व लहान मासे मोर आणि कावळा म्हातारी आणि तिची मेंढी लावी पक्षीण व तिची पिले कुत्रा आणि त्याचा मालक कोंबडी आणि कोल्हा