Get it on Google Play
Download on the App Store

कोल्हा आणि लांडगा

एक कोल्हा एकदा एका लांडग्याला म्हणाला, 'मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही. एखादा म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला निर्वाह करावा लागतो. त्यामुळे मी अगदी कंटाळल्यासारखा झालो आहे. शिवाय भक्ष्य मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचित येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गावठाणात लपतछपत फिरावं लागतं. तुझं तसं नाही. तू आपलं भक्ष्य रानात; कुरणात मिळवू शकतोस. ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल. तुझ्या हाताखाली शिक्षणासाठी राहिल्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मारून खाण्याचा मान मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. तू मला शिकवलंस तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ तुझ्यावर नक्कीच येणार नाही.' लांडगा म्हणाला, 'ठीक आहे, मी प्रयत्‍न करून पाहतो. प्रथम तू पलिकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांघरून ये.' तसं करताच लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकवले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे, मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे, एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले. सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेना. पण तो मुळातच हुषार असल्याने ते सगले तो लवकरच व्यवस्थित करू लागला. त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले, शेवटी एक मोठा मेंढ्यांचा कळप कोल्ह्याला दिसताच त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या, धनगर व त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडवून दिली. त्याने एक मोठी मेंढी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्याचा आवाज ऐकू आला. तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेषाचे त्याला भान राहिले नाही व त्याने ते लांडग्याचे कातडे फेकून दिले व गुरूचा निरोपही न घेता तो तडक त्या कोंबड्याकडे धावला.

तात्पर्य

- मूळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही.

इसापनीती कथा २५१ ते ३००

इसाप
Chapters
रानटी व गावठी हंस आजारी गाढवी व भुकेले लांडगे जीभ कोल्हा आणि लांडगा पावसाचा थेंब कस्तुरी मृग कोल्हा आणि काटेझाड कुत्रा व बोकड माणूस व सिंह कानस व साप दोन उंदीर कैदी झालेला लांडगा लांडगा आणि गाढव लांडगा आणि सिंह कोंबडी आणि साळुंकी वानर आणि सुतार करडू आणि लांडगा खेचर कुत्रा आणि कोंबडी लांडगे आणि बोकड माणूस आणि मुंगूस म्हातारा कुत्रा म्हातारा आणि त्याचे मुलगे मुंगी आणि माशी पशू, पक्षी आणि वटवाघूळ साप आणि माणूस साळू आणि लांडगा ससा आणि कासव ससे आणि बेडूक साळुंकी आणि इतर पक्षी सिंह आणि रानडुक्कर सिंह आणि हरिण वानर व अग्नी काळा माणूस उंट व त्याचा मालक उंट आणि माकड उंदीर आणि बोका टोळ आणि गाढव सिंह व त्याचे तीन प्रधान सिंह, गाढव आणि कोल्हा सिंह, अस्वल आणि कोल्हा शेतकरी आणि चिमण्या मुलगा आणि नाकतोडा मोठे मासे व लहान मासे मोर आणि कावळा म्हातारी आणि तिची मेंढी लावी पक्षीण व तिची पिले कुत्रा आणि त्याचा मालक कोंबडी आणि कोल्हा