Get it on Google Play
Download on the App Store

इस्लामी संस्कृति 63

या गोष्टीमुळें युरोपियन ख्रिश्चन इतिहासकार मुहंमदांस रक्तार्थ तहानलेला वगैरे विशेषणें देत असतात. इंग्रज सेनापति वेलिंग्टन यानें स्पेनमधून त्या मोहिमेच्या वेळेस शेंकडों लोकांना रस्त्याच्या दुतर्फा कसें फांशी देऊन टाकलें, तें युरोपियन इतिहासकारांनीं ध्यानांत घ्यावें. हिंदुस्थानांतील सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दाच्या वेळेस इंग्रजांनीं ज्याचें ज्याचें नांव नानासाहेब होते त्याला त्याला फांशी दिलें, हें या टीकाकारांनीं ध्यानांत घ्यावें. आजच्या युध्दांतहि कशा गोष्टी होत आहेत तें पहावें.

ज्यूंचा अपराध मोठा होता. ऐन लढायीचे वेळेस त्यांनीं द्रोह केला. करारभंग करुन दगाबाजी केली. कोणतें शासन द्यावें ? आजचींहि राष्ट्रें अशा आणीबाणीच्या वेळेस कोणती शिक्षा देतील ? सादनें निकाल दिला तो त्या काळांतील युध्दनीतीप्रमाणें दिला. आणि सादनें निकाल द्यावा, अशी ज्यूंची मागणी होती. ज्यूंनीं जिंकलें असतें तर त्यांनीं तेंच केलें असतें. ख्रिस्त्यांनीं का आरंभी व नंतर थोडया कत्तली केल्या ? ख्रिश्चन नीतिशास्त्रज्ञ तर स्पष्ट सांगत व लिहीत कीं, 'दुस-या निर्मळ व निष्पाप जीवांस पापी पापप्रवृत्त करतात. अशा पाप्यांना व दुष्टांना जिवंत ठेवण्यापेक्षां शंभर वेळां नष्ट करणें बरें.' परंतु मुस्लिम इतके निर्दय नाहींत. तें एवढेंच म्हणतात, 'त्या वेळेस मुहंमद व त्यांचे अनुयायी यांच्यासमोर जगण्यामरण्याचा प्रश्न होता. बाल्यावस्थेंतील अरब राष्ट्र जगतें ना. मुस्लिम धर्म टिकता ना. पुढें पसरता ना; व पुढें जी भव्य संस्कृति फुलली, पुढील अज्ञान काळांत मुस्लीम संस्कृतीनें जी ज्ञानाची मशाल पेटवली, नवसंस्कृतीला सर्वत्र चालना दिली, जींतून पुढील युरोपियन संस्कृति संभवती झाली तें सारें होतें ना.'

ख्रिश्चन नीतिशास्त्रज्ञ लिहितात तेवढें वाटतें बरोबर ? ख्रिश्चन करतात तेवढें वाटतें रास्त ? इंग्लंडमधील ऑलिव्हर क्रॉमवेलनें आयरिश कॅथालिकांची कशी एकजात कत्तल केली ! कोणी लांडगा मारला तर त्याला बक्षीस देत त्याप्रमाणें कॅथॉलिकांचें मुंडके आणलें तर त्याला कसें बक्षीस दिलें जाई ? आणि पुन्हा या सतराव्या शतकांतील गोष्टी. आणि क्रॉमवेल म्हणे अत्यंत धर्मभीरु होता ! धर्मात्मेच फक्त त्याच्या सैन्यांत असत ! रोज प्रार्थना करणारांनाच तो आपल्या सैन्यांत घेई ! तोंडानें प्रार्थना म्हणत ते हल्ला करीत. आणि क्रॉमवेलच्या या क्रूरतेचे समर्थन करतांना तत्त्वज्ञ व इतिहासकार कार्लाईल लिहितो :

"न्यायी ईश्वराचा मी शिपायी आहें, या भावनेनें जागृत असलेला वीरपुरुष मृत्यूप्रमाणें कठोर बनतो. नशिबाप्रमाणें, भवितव्यतेप्रमाणें, त्या अंतिम न्यायदिनाप्रमाणें कठोर बनतो. आणि देवाच्या शत्रूंवर देवाचा निकाल जणुं देत असतो.'

स्त्रिया व मुलें गुलाम केल्यावर त्यांची वांटणी झाली ! कोणी इतिहासकार म्हणतात, 'रैहान नावांची ज्यू स्त्री मुहंमदांसाठीं ठेवली गेली होती !' परंतु या गोष्टीस पुरावा मिळत नाहीं. मुहंमदांच्या इतर सर्व स्त्रियांची हकीकत मिळते. परंतु ती मुहंमदांची स्त्री होती असा कोठेंहि उल्लेख येत नाहीं. तेव्हां ही एक कल्पित कथा असावी.

इस्लामी संस्कृति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
इस्लामी संस्कृति 1 इस्लामी संस्कृति 2 इस्लामी संस्कृति 3 इस्लामी संस्कृति 4 इस्लामी संस्कृति 5 इस्लामी संस्कृति 6 इस्लामी संस्कृति 7 इस्लामी संस्कृति 8 इस्लामी संस्कृति 9 इस्लामी संस्कृति 10 इस्लामी संस्कृति 11 इस्लामी संस्कृति 12 इस्लामी संस्कृति 13 इस्लामी संस्कृति 14 इस्लामी संस्कृति 15 इस्लामी संस्कृति 16 इस्लामी संस्कृति 17 इस्लामी संस्कृति 18 इस्लामी संस्कृति 19 इस्लामी संस्कृति 20 इस्लामी संस्कृति 21 इस्लामी संस्कृति 22 इस्लामी संस्कृति 23 इस्लामी संस्कृति 24 इस्लामी संस्कृति 25 इस्लामी संस्कृति 26 इस्लामी संस्कृति 27 इस्लामी संस्कृति 28 इस्लामी संस्कृति 29 इस्लामी संस्कृति 30 इस्लामी संस्कृति 31 इस्लामी संस्कृति 32 इस्लामी संस्कृति 33 इस्लामी संस्कृति 34 इस्लामी संस्कृति 35 इस्लामी संस्कृति 36 इस्लामी संस्कृति 37 इस्लामी संस्कृति 38 इस्लामी संस्कृति 39 इस्लामी संस्कृति 40 इस्लामी संस्कृति 41 इस्लामी संस्कृति 42 इस्लामी संस्कृति 43 इस्लामी संस्कृति 44 इस्लामी संस्कृति 45 इस्लामी संस्कृति 46 इस्लामी संस्कृति 47 इस्लामी संस्कृति 48 इस्लामी संस्कृति 49 इस्लामी संस्कृति 50 इस्लामी संस्कृति 51 इस्लामी संस्कृति 52 इस्लामी संस्कृति 53 इस्लामी संस्कृति 54 इस्लामी संस्कृति 55 इस्लामी संस्कृति 56 इस्लामी संस्कृति 57 इस्लामी संस्कृति 58 इस्लामी संस्कृति 59 इस्लामी संस्कृति 60 इस्लामी संस्कृति 61 इस्लामी संस्कृति 62 इस्लामी संस्कृति 63 इस्लामी संस्कृति 64 इस्लामी संस्कृति 65 इस्लामी संस्कृति 66 इस्लामी संस्कृति 67 इस्लामी संस्कृति 68 इस्लामी संस्कृति 69 इस्लामी संस्कृति 70 इस्लामी संस्कृति 71 इस्लामी संस्कृति 72 इस्लामी संस्कृति 73 इस्लामी संस्कृति 74 इस्लामी संस्कृति 75 इस्लामी संस्कृति 76 इस्लामी संस्कृति 77 इस्लामी संस्कृति 78 इस्लामी संस्कृति 79 इस्लामी संस्कृति 80 इस्लामी संस्कृति 81 इस्लामी संस्कृति 82 इस्लामी संस्कृति 83 इस्लामी संस्कृति 84 इस्लामी संस्कृति 85 इस्लामी संस्कृति 86 इस्लामी संस्कृति 87 इस्लामी संस्कृति 88