Get it on Google Play
Download on the App Store

इस्लामी संस्कृति 60

ज्यूंशीं झगडा

मक्केचे मूर्तिपूजक सूडासाठीं जळत होते. मोठया युध्दाची त्यांनीं पुन्हा तयारी चालविली. त्यांनीं इतरहि जातिजमाती बोलावल्या. तीन हजार सेना सिध्द  झाली. तो निर्दय व करारी अबु सुफियान मुख्य नेता झाला. सेना निघाली. मदिनेच्या ईशान्येस तळ देऊन बसली. एक टेंकडी व दरीच काय ती मध्यें होती. येथें तळ देऊन हें सैन्य मदिनेस सतावूं लागलें. शेतें, फळांच्या बागा सारें उध्वस्त करुं लागलें. शेवटी मुहंमद एक हजार लोकांनिशीं बाहेर पडले. परंतु ऐन वेळी ज्यूंच्या चिथावणीमुळें अब्दुल्ला इब्न उबयाचे तीनशें लोक फुटले. हे मुनाफिकीन होते. ते अलग झाले. लढायला येत ना. तरी मुहंमद कचरले नाहींत. रात्रीच्या वेळेस ते हळूच बाहेर पडले. ओहोद टेंकडी त्यांनीं गांठली. रात्रभर टेंकडीवर राहून सकाळीं प्रार्थना करुन ते निघाले. अर्धचंद्राकार रचनेनें शत्रुसैन्य पुढें आलें. अबु सुफियान व त्यांच्या देवदेवतांच्या मूर्ति मध्यभागीं होत्या. ओहोदची टेंकडी मदिनेपासून तीन मैलांवर होती. मुहंमदांनीं कांहीं तिरंदाजांस उंच जागीं मागें ठेवलें. जागचे हलूं नका सांगितलें. आणि निघाले. कुरेशांचा पहिला हल्ला पिटाळला गेला. हमजाची बहादुरी अपूर्व होती. परंतु तिरंदाज कर्तव्य विसरले. ते एकदम विजयच मिळाला असें समजून लुटालूट करायला निघाले ! शत्रुपक्षाकडील खालिद बिन वलीद याच्या लक्षांत ही चूक आली. तो एकदम आपलें घोडदळ जमवून मुहंमदांच्या पिछाडीवर तुटून पडला. मुसलमान मध्यें सांपडले. शूर हमजा या लढाईत पडला ! आणखीहि मोठमोठे मोहरे प्राणांस मुकले. अली, उमर, अबुबकर सारे जखमी झाले. शत्रूंचा मुहंमदांवर डोळा होता. कांही एकनिष्ठ अनुयायांची मांदी मुहंमदांभोंवतीं होती. मुहंमद जखमी झाले होते. रक्त गळत होतें. एक अनुयायी तें थांबवूं पहात होता. त्याच्या हाताचें तशा प्रसंगांतहि पैगंबरांनीं प्रेमानें चुंबन घेतलें. किती प्रेमळ त्यांचे हृदय ! आणि प्रेमळ हृदयें त्यांच्या आसपास मरत होती. परंतु इतक्यांत अली आपल्या शूर अनुयायांसह मुहंमदांच्या बचावासाठीं धांवून आले. मुहंमदांसह ते ओहोद टेंकडीवर परत आले. अलीनें आपल्या ढालींतून पाणी आणलें. त्यानें प्रेमानें मुहंमदांचें तोंड धुतलें, जखमा धुतल्या आणि भर दुपारीं सर्वानीं प्रार्थना केली. कुरेशहि थकले होते. मदिनेवर चालून जाण्याचें किंवा टेंकडीवर प्रार्थना करणा-यांवर चढाई करण्याचें त्यांना धाडस झालें नाही. मुहंमदांकडील जे धर्मवीर मरुन पडले होते, त्यांची प्रेतें छिन्नभिन्न करीत ते बसले. त्या वीरांच्या मृत देहांची ते विटंबना करीत होते. अबु सुफियानची पत्नी हिंद व इतर कुरेश स्त्रिया, ज्या लढायांत हुरुप व उत्साह द्यायला आल्या होत्या त्यांनीं क्रूरपणाची कमाल केली. त्या बायांनी शूर व दिलदार हमजाचें काळीज कापून घेतलें ! मृत वीरांचे कान कापून घेतले. नाकें कापून घेतली. त्यांचे अलंकार करुन त्यांनीं कानांत गळयांत घातले. त्यांची कांकणें करुन हातांत घातली. ही विटंबना पाहून शांतमूर्ति व क्षमामूर्ति मुहंमदहि सात्त्वि संतापानें लाल झाले. ते संतापानें म्हणाले, 'अत:पर यांनाहि असेंच वागवूं.' परंतु पुन्हा शांत झाले व म्हणाले, 'नको असें नको. अन्याय सहनशीलपणें सोसूं या. सहन करुं या. जो शांतीनें सहन करील त्याचेंच कल्याण होईल. बुरें सोसणाराचें भलें होईल.' मुहंमदांच्या या उद्गारांनीं मुसलमानांस शत्रूशीं दिलदारपणें वागावयास शिकविलें आहे. शत्रूची विटंबना करणें, हालहाल करुन मारणें ही गोष्ट मुस्लिम धर्मास संमत नाहीं. मुहंमदांस हें पसंद नव्हतें. पहिल्या महायुध्दांत शत्रूंच्या कैद्यांस सर्वांत चांगल्या रीतीनें तुर्कस्थाननें वागविलें, असें सा-या राष्ट्रांनीं कबूल केलें.

या लढाईत अनिर्णितच सामना राहिला. कुरेशहि माघारे गेले. मुहंमद मदिनेंत परत आले. परंतु आपण हताश झालेलों नाहीं, निरुत्साह झालेलों नाहीं हें दाखविण्यासाठीं शत्रूचा पाठलाग करण्यासाठीं त्यांनीं एक टोळी पाठवली. अबु सुफियान त्वरा करुन मक्केस पोंचला. 'लौकरच तुमचें निर्मूलन करण्यासाठी पुन्हा येऊं.' असा त्यानें निरोप पाठविला. तो निरोप ऐकून मुहंमद म्हणाले, 'आमच्याबरोबर परमेश्वर आहे तेवढा पुरे. तोच खरा संरक्षक !'

आसपासच्या टोळयाहि मदिनेस आतां वरचेवर त्रास देऊं लागल्या. मुहंमदांनीं ताबडतोब या गोष्टीचा बंदोबस्त केला. कांही जमाति 'आम्हांस उपदेश करायला कोणी पाठवा. आम्ही मुसलमान होऊं' असा निरोप पाठवीत. परंतु प्रचारक गेले कीं, त्यांची कत्तल करीत. एकदां असे सत्तर जण मारले गेले. नवधर्माची सत्त्व-परिक्षा प्रभूनें चालविली होती. बलिदानाचा पाया घातला जात होता. शुध्द बीं पेरलें जात होतें.

इस्लामी संस्कृति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
इस्लामी संस्कृति 1 इस्लामी संस्कृति 2 इस्लामी संस्कृति 3 इस्लामी संस्कृति 4 इस्लामी संस्कृति 5 इस्लामी संस्कृति 6 इस्लामी संस्कृति 7 इस्लामी संस्कृति 8 इस्लामी संस्कृति 9 इस्लामी संस्कृति 10 इस्लामी संस्कृति 11 इस्लामी संस्कृति 12 इस्लामी संस्कृति 13 इस्लामी संस्कृति 14 इस्लामी संस्कृति 15 इस्लामी संस्कृति 16 इस्लामी संस्कृति 17 इस्लामी संस्कृति 18 इस्लामी संस्कृति 19 इस्लामी संस्कृति 20 इस्लामी संस्कृति 21 इस्लामी संस्कृति 22 इस्लामी संस्कृति 23 इस्लामी संस्कृति 24 इस्लामी संस्कृति 25 इस्लामी संस्कृति 26 इस्लामी संस्कृति 27 इस्लामी संस्कृति 28 इस्लामी संस्कृति 29 इस्लामी संस्कृति 30 इस्लामी संस्कृति 31 इस्लामी संस्कृति 32 इस्लामी संस्कृति 33 इस्लामी संस्कृति 34 इस्लामी संस्कृति 35 इस्लामी संस्कृति 36 इस्लामी संस्कृति 37 इस्लामी संस्कृति 38 इस्लामी संस्कृति 39 इस्लामी संस्कृति 40 इस्लामी संस्कृति 41 इस्लामी संस्कृति 42 इस्लामी संस्कृति 43 इस्लामी संस्कृति 44 इस्लामी संस्कृति 45 इस्लामी संस्कृति 46 इस्लामी संस्कृति 47 इस्लामी संस्कृति 48 इस्लामी संस्कृति 49 इस्लामी संस्कृति 50 इस्लामी संस्कृति 51 इस्लामी संस्कृति 52 इस्लामी संस्कृति 53 इस्लामी संस्कृति 54 इस्लामी संस्कृति 55 इस्लामी संस्कृति 56 इस्लामी संस्कृति 57 इस्लामी संस्कृति 58 इस्लामी संस्कृति 59 इस्लामी संस्कृति 60 इस्लामी संस्कृति 61 इस्लामी संस्कृति 62 इस्लामी संस्कृति 63 इस्लामी संस्कृति 64 इस्लामी संस्कृति 65 इस्लामी संस्कृति 66 इस्लामी संस्कृति 67 इस्लामी संस्कृति 68 इस्लामी संस्कृति 69 इस्लामी संस्कृति 70 इस्लामी संस्कृति 71 इस्लामी संस्कृति 72 इस्लामी संस्कृति 73 इस्लामी संस्कृति 74 इस्लामी संस्कृति 75 इस्लामी संस्कृति 76 इस्लामी संस्कृति 77 इस्लामी संस्कृति 78 इस्लामी संस्कृति 79 इस्लामी संस्कृति 80 इस्लामी संस्कृति 81 इस्लामी संस्कृति 82 इस्लामी संस्कृति 83 इस्लामी संस्कृति 84 इस्लामी संस्कृति 85 इस्लामी संस्कृति 86 इस्लामी संस्कृति 87 इस्लामी संस्कृति 88