Get it on Google Play
Download on the App Store

राजगृहात 4

तो लाजला. तिने त्याला फलाहार दिला. सुंदर रसाळ फळे.
'जातो आता मी.' तो म्हणाला.

तिने नोकराला हाक मारली. घोडयाच्या गाडीतून त्याला पोचविण्यास तिने सांगितले.

'परंतु थांबा, तुम्ही सुंदर पोषाख करा. तुम्ही कलावान् आहात. माझे कलावान्. ही घ्या वस्त्रे. घाला अंगावर. डोक्याला नका काही बांधू. तुमची झुलपे तुम्हाला शोभतात.' ती म्हणाली.

सुंदर रेशमी पोषाख करून तो निघाला. किती गोड दिसत होता त्या वेळेस विजय! सुलोचना त्याच्याकडे पाहात राहिली. घोडयाच्या गाडीतून विजय गेला. तो घरी आला.

'तुमच्यावर फार कृपा दिसते त्या मुलीची. तुमचे भाग्य आता फुलेल.' घरमालक म्हणाला. 'देवाची दया.' विजय म्हणाला.
विजय आता त्या मालकाकडेच जेवी. तो त्याच्या घरातलाच झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी सुलोचनने मेवामिठाई, फळांचे करंडे वगैरे भरून विजयकडे पाठविले. विजयने ते सारे घरमालकाकडे दिले. त्याने शेजार्‍यांनाही दिले.

विजय आता रोज तिसर्‍या प्रहरी सुलोचनेकडे जाऊ लागला. ती एका आसनावर हातात फुले घेऊन बसे आणि तिच्याकडे पाहून विजय तिचे चित्र काढी. चित्र काढताना विजय खाली बघे; परंतु सुलोचनेची दृष्टी त्याच्याकडे असे. त्याच्या लक्षात ही गोष्ट येई व तो गोंधळे. मग त्याचे कलम नीट काम देत नसे.

'पुरे आज. माझे मन जरा अस्वस्थ आहे.' तो म्हणे.

'पुरे. घाई काय आहे? माझे चित्र कधी पुरे न होवो असेच मला वाटते. रोज एक कुंचला मारा व पुरे करीत जा काम. बरेच दिवस पुरेल. तुम्ही बरेच दिवस राहाल.' असे ती हसून म्हणे.

'जातो आता.' तो म्हणे.

यती की पती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
कलवान विजय 1 कलवान विजय 2 कलवान विजय 3 कलवान विजय 4 प्रदर्शनार्थ प्रयाण 1 प्रदर्शनार्थ प्रयाण 2 प्रदर्शनार्थ प्रयाण 3 राजधानीत 1 राजधानीत 2 राजधानीत 3 राजधानीत 4 घरी परत 1 घरी परत 2 घरी परत 3 घरी परत 4 घरी परत 5 घरी परत 6 तुरुंगात 1 तुरुंगात 2 तुरुंगात 3 तुरुंगात 4 तुरुंगात 5 तुरुंगात 6 तुरुंगात 7 तुरुंगात 8 मातृभूमीचा त्याग 1 मातृभूमीचा त्याग 2 मातृभूमीचा त्याग 3 मातृभूमीचा त्याग 4 परिभ्रमण 1 परिभ्रमण 2 परिभ्रमण 3 परिभ्रमण 4 परिभ्रमण 5 परिभ्रमण 6 परिभ्रमण 7 चोरांच्या हातून सुटका 1 चोरांच्या हातून सुटका 2 चोरांच्या हातून सुटका 3 चोरांच्या हातून सुटका 4 चोरांच्या हातून सुटका 5 राजगृहात 1 राजगृहात 2 राजगृहात 3 राजगृहात 4 राजगृहात 5 राजगृहात 6 सर्वनाश 1 सर्वनाश 2 सर्वनाश 3 सर्वनाश 4 सर्वनाश 5 सर्वनाश 6 यतिधर्माची दीक्षा 1 यतिधर्माची दीक्षा 2 यतिधर्माची दीक्षा 3 यतिधर्माची दीक्षा 4 स्वदेशात 1 स्वदेशात 2 स्वदेशात 3 स्वदेशात 4 *शेवट 1 *शेवट 2