Get it on Google Play
Download on the App Store

'कल्की'च्या निमित्ताने 3

आणि स्टॅलिनला एकांती भेटण्याचा, त्याच्याशी विचारविनिमय करण्याचा मान भारताच्या या तत्त्वज्ञ वकिलालाच मिळालेला होता !

स्वातंत्र्यानंतर डॉ. राधाकृष्णन् रशियात भारताचे राजनैतिक वकील म्हणून सुमारे तीन वर्षे गेले खरे ; पण भारताची सांस्कृतिक वकिली त्यांनी आपल्या आयुष्यभर केली हेच अधिक खरे आहे !

भारताच्या सांस्कृतिक मोठेपणाची बाजू त्यांनी नेहमीच मोठ्या हिरीरीने, बिनतोड युक्तिवादाने आणि मूलगामी बुद्धीने जगाच्या विचारवंतांपुढे मांडलेली आहे.

विज्ञानाच्या या युगात अध्यात्माची महती पटवून देण्याची महान कामगिरी त्यांनी बजावली आहे. विज्ञानाच्या गैरवापरामुळे मानवतेला धोका निर्माण झाला असताना, डॉ.राधाकृष्णन् यांनी मानवाला चिरमंगलाचा, शाश्वततेचा खराखुरा मार्ग दाखविलेला आहे.

प्लेटो हा एक प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ होऊन गेला. ‘रिपब्लिक’ नावाचा त्याचा ग्रंथ फारच मान्यता पावलेला आहे. प्लेटोची अशी कल्पना होती की, राज्यकारभाराची सूत्रे ज्या व्यक्तीच्या हातात केंद्रित झालेली असतात ती व्यक्ती तत्त्वज्ञानी असावी. पूर्वीच्या काळात राजा हाच सार्वभौम, सत्ताधीश असे. प्लेटोचे हे तत्त्वज्ञ राजा- ‘फिलॉसॉफर किंग’ चे स्वप्न भारतात १९६२ साली राधाकृष्णन् हे जेव्हा दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले, तेव्हा त्यांच्या रुपाने अंशतः का होईना, साकार झाले आहे, असे म्हटले पाहिजे. राजेशाही नष्ट झाल्यानंतर आजच्या लोकशाही युगात राष्ट्राध्यक्ष पद हेच श्रेष्ठ मानले जाते. १९५४ सालीच डॉ. राधाकृष्णन् यांना भारताने आपला सर्वश्रेष्ठ ‘भारतरत्न’ हा किताब बहाल केलेला होता !

डॉ. राधाकृष्णन् यांची तत्त्वज्ञान विषयक मौलिक अशी ग्रंथनिर्मिती बरीच आहे. ‘इंडियन फिलॉसफी’, ‘दि हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ’, ‘दि रिलिजन वुई नीड’ आदी. त्यांच्या ग्रंथांना जागतिक कीर्ती लाभलेली आहे. त्यांपैकीच त्यांचा ‘कल्की-दि ऑफ सिव्हिलायझेशन’ हा महत्त्वाचा ग्रंथ होय. या ग्रंथात राधाकृष्णन् यांनी आपले सर्व तत्त्वज्ञान अगदी थोडक्यात सूत्ररुपाने मांडलेले आहे. ग्रंथ लहान असला तरी ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशी याची ठेवण आहे. या ग्रंथात शास्त्रीय शोधामुळे जगात ऐक्यभाव निर्माण झाल्याचा भास होत असला, तरी अंतःस्थिती काही निराळीच आहे.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26