लावणी १९३ वी
सोड गीता-भागवत पाही दाखला । तुरा कलगीचा गुलाम सांगता नाहीं लाज तुजला ॥धृ०॥
नह्मता दुंमदुमकार । तेव्हाचा ऐक दाखला निर्गुणनिराकार । तेव्हां तो होता एकला । मग सुटलो वायो त्याचे पोटी तेज झाला । त्या तेजाचे पोटीं ब्रह्म-बीज जन्मला । इथून म्होरं मेरूमदार पुसतो तुजला ॥१॥
अनंत्या त्याच्या मावा, कूर्म अवतार त्यानें धरला । पातळ भुवनामधिं त्यानी प्रकाश मांडला । अपले मस्तकीं शेष त्यांनीं स्थापला । शेषाचे मस्तकी आकार गोटीचा केला ॥२॥
निरगुण निराकार त्यांनी केलीसे लीला । नित अनिमंदा अंगुळ सोपली तिजला ( ? ) । तेव्हां ती सती काये बोले निरगुणाला । काये तुमके पैदा केलें कशाला । जयब्रह्मा विष्णु आहे भ्रतार दिले तुजला । मग करू शृंगार गेली विषय भोगायाला | x x x म्हणतो माझी माता कशी भोगूं तुजला ? ॥३॥
गोटीची लांबी रुंदी सांग हां मला । कोणता ब्रह्म होत मेरूच्या पठाराला । कोणत्या वृक्षाचें फळ पडलें धरणीला ? । त्याची वाहती नदी शाहिरा तिचें नांव बोला । गासी टाणाटोणा तू पाखडाला, दे येवढें सांगून, नाहीं तर हो आमचा चेला ॥४॥
कविराज येमा म्हणे आज पुस्ता झालों तुजला । किती स्वर्गाची उंची ? सांग आम्हांला । किती कोस भरले? येकदां हिशेब करून बोला । फुगलास डुकरावाणी, शहाणपण कळलं अवघ्याला । कोणत्या गोष्टीमधिं तुरा गुलाम ठरविला ? । कोणत्या निरगुण मजुर शेतीला केला । खडुर गुह्य ने ( ? ) दोही शास्राचा दाखला । गणू महादू म्हणे कर नागेशावर हल्ला ॥५॥