लावणी १३८ वी
धन्य संन्यासी महातापसी योग्यांचा राव । मुगुटमणी महाराज सुत व्यासांचा शुकदेव । इंद्रपुरींत कीर्तमात अद्भुत फांकली । तेतीस कोटी देवसभा इंद्राची घनवटली । थकीत सुरवर गण-गंधर्व दीनवदनें जालीं । त्या समईं कशी युक्त आठवली । तेव्हां इंद्राने रंभा आणीवली । काय तियेसी आज्ञा केली ‘सिद्धवनासी जाईं वहिला । तप शुकदेवा ढळावें । कार्यसिद्ध करून यावें; ॥१॥
रंभा विलासी बोले तयासी ‘ऐक इंद्रदेवा । महा महा सिद्ध ऋषी अगाध देवाधिदेवा । कामाचें पाईं चुकला नाहीं शंकर माहादेव । बोले शुकदेवा कोण केवा । पाराशरासी भग्न घडावा । चंद्र गुरूपत्नीसी न्यावा । रुक्मांगद आणि नारद पाहावा । ऐसे किती एक सांगावें । ब्रह्मदेव कन्ये धरूं धावे’ ॥२॥
घेउनी आज्ञा केली प्रतिज्ञा त्याला मोहीन । तरिच रंभारत्न, नाहीं तर धीग माझें जिणें, करून जडीत बस्त्रें भूषणें ल्याली लवकुन । डोलत डोलत गजभारानें । संगीत सुरवर करी गायन, रागज्ञान तानमान । दाखवी कवतुक हावभाव । ‘तापशा, नयन उघडावे’ ॥३॥
‘सांडुन कां निष्काम जालास योगिया । सहा शट् अठराचा चारी वेद, करुनीयां । जपतप साधन केलें क्ष मुद्रा लाउनियां । काम चेतलावो, नये आवराया नेटकी जाया । आली या ठायां तुसीं तुसीं भोगाया आपुली काया । निजसुख स्त्रियेचें पाहावें । नाहीं तरी जन्मा कां यावें ?’ ॥४॥
निष्ठुर वचना ऐकुन कानीं तेव्हां शुकदेवानं । पाहे कौतुक, उभी सन्मुख, देखीली कामीन । दीप्ती झळाळी कांती कोवळी लोपे नयनानें । ‘सांग लौकुन गे कोणाची कोण ? । येथें यावया काय कारण ? आम्ही तापसी योगी दारुण । पाहु नयें स्त्रीयेचें वदन । भगवंतापासी होइल हाण । लौकर उठोनियां जावें । आणखी नेणो तुझा भाव ॥५॥
‘तुझे प्रतापें बुडाले पापें बहुत थोर मागें । अहिरावण’ महिरावण कीचक बंधु अवघे गे । सुंदोपसुंद दोघे बंधु नाहीं बंधु नाहीं चुकले गे । हो हो दुर गे परती सर गे । भस्म जाला भस्मासुर गे । चंद्र कलंकी जाला वर गे । भगें इंद्रासी जाला दाग । कांहीं न चले उपाव । ऐसी स्त्रीयांची माव ॥६॥
‘चतुर सुंदर रूपनागर गोमती । जसें इंद्रायण गोजिरवाणें आतं गे कडवट । तैसें शरीर तुझें अघोर दुर्घन अचाट । अमंगळ पोट नर्क किडयांचा भरला सांट । मळमूत्राची अवघी मोट’ । तेव्हां रंभेला विशाद वाटे । घेउनी शस्त्र विदारिलें पोट । वनीं सुगंध न समावे । जैसे अष्ट गंध बरवे ॥७॥
बोले शुक योगी रंभेलागीं, ‘ऐकावी मात । बारा वर्षें नर्क भोगिला माते उदरांत । असें जरिं ठावें असतें तरी तुझ्या जन्मतों उदरांत । कां गे लज्जीत तूं मनांत ?’ शुकदेवाने जोडिले ह्स्त । ‘तुझा बाळ मी शरणांगत । पाहा पाहा रवी पश्चिमे उगवे । नेमा न चळे शुकदेव’ ॥८॥
रंभेचा गर्व हरला, सर्व रंग जाला फीका । नीर्लज्यावाणी लागे चरणीं उचीच आलें कां । केला उपाव सिद्धी व पावे येउनीं ठकलें कां ? । रंभा गेली वो रंभा गेली स्वर्गलोकां । तिची त्रिभुवनीं जाली टीका । म्हणे केशव संत साधकां । कवी अवधुता शरण देखा । कवित्व मतीनें वदलों टीका । ऐसा रचिला कटाव । पाहुन घ्यावा अनुभव ॥९॥