अभंग ६३ - सोपानसमाधीबैसला ॥ सकळीपु...
सोपानसमाधीबैसला ॥ सकळीपुष्पवर्षावकेला ॥ जयजयकारेभूगोळकोंदला ॥ आनंददाटलामहीवरी ॥१॥
धन्यधन्यहासोपान ॥ वर्णीतसेश्रीभगवान ॥ क्षणोक्षणामाजीआठवण ॥ उद्विग्नमनहोतसे ॥२॥
नारदतुंबरअक्रूरउद्धव ॥ पुंडलीकआदिसर्व ॥ मुनिदेवगणगंधर्व ॥ स्तुतिस्तवबोलती ॥३॥
म्हणतीचौघेजणभाग्याचे ॥ जेनिदानब्रह्मादिकांचे ॥ तेनिजध्यानशंकराचे ॥ सकळजीवांचीजीवनकळा ॥४॥
तोप्रत्यक्षयेउनीअनंत ॥ याचीपरिचर्याकरीत ॥ भक्तासाह्यहोउनीभगवंत ॥ पूर्णाआर्तकरावया ॥५॥
भक्तांचेनिकौतुक ॥ करोनिब्रह्मांडनायक ॥ तयावर्णितीसनकादिक ॥ वरकडमशकबापुडे ॥६॥
पुंडलीकविस्मयेबोलती ॥ हेचौघेभाग्याच्यामूर्ति ॥ यांच्यानामेजग उद्धरती ॥ पावेविश्रांतीजीवांसी ॥७॥
नामाम्हणेसकळजगाचा ॥ उदयझालासेदैवाचा ॥ सुकाळकेलास्वानंदाचा ॥ ब्रह्मविद्येचामृत्युलोकी ॥८॥