अभंग ४० - गगनपंथेशुभ्रविमाने ॥ देव...
गगनपंथेशुभ्रविमाने ॥ देवलक्षितीअधोवदने ॥ तव अळंकापुरीकीर्तने ॥ टाळमृदंगझणत्कार ॥१॥
जयजयकारक्षितीहोत ॥ महादोषांसंहारघात ॥ नामाअसेनाचत ॥ पांडुरंगापुढे ॥२॥
रामकृष्णअवतार ॥ चरित्रगातीसविस्तर ॥ वैष्णवीकेलाजयजयकार ॥ पांडुरंगेम्हणितले ॥३॥
ज्ञानदेवबैसलेसमाधी ॥ पुढेअजानवृक्षनिधी ॥ वामभागीपिंपळक्षिती ॥ सुवर्णाचाशोभत ॥४॥
निवृत्तीसोपानखेचर ॥ ज्ञानदेवमुक्ताईनिरंतर ॥ हेउत्तरद्वारेसमोर ॥ बैसतेजाहले ॥५॥
देवम्हणेज्ञानेश्वरा ॥ चंद्रसूर्यदिनकरा ॥ तवतुझीसमाधीस्थिरा ॥ राहोरेनिरंतर ॥६॥
जवराहेक्षितीमंडळ ॥ जववरीहेसमुद्रजळ ॥ मगकल्पक्षयीययथाकाळ ॥ माझेह्रदयीठसावे ॥७॥
आणिएकसोपारे ॥ ज्ञानदेवहीअक्षरे ॥ जोजपेलनिर्धारे ॥ ज्ञानत्यासीहोईल ॥८॥
ऐसादिधलाआशिर्वाद ॥ मगसंतांसिबोलेगोविंद ॥ ज्ञानदेवाऐसाउद्बोध ॥ दुजानदेखोसृष्टीसी ॥९॥
नामाम्हणेस्वामीमाझा ॥ अंगिकारकेलावोजा ॥ पावलाभक्ताचियाकाजा ॥ गरुडारूढहोउनी ॥१०॥