अभंग ५० - परब्रह्मपरमूर्ती ॥ परंधा...
परब्रह्मपरमूर्ती ॥ परंधामपरात्परकीर्ती ॥ परमप्रियपरंज्योती ॥ स्वातिस्मृतीस्वानुभव ॥१॥
अकळविकळनिरंजन ॥ ज्ञाताज्ञानविश्वघन ॥ संशयदृश्यनिरसन ॥ विश्वप्रिय ॥२॥
कमळनयनविकाशा ॥ ह्रदयकमळविलासा ॥ चरणकमळविश्वेशा ॥ चित्तमुखधाम ॥३॥
चराचरसच्चिदानंदांग ॥ शुद्धस्नानशंकरदिव्यांग ॥ विष्णूमूर्तिपांडुरंग ॥ सगुणरूपभीमातटी ॥४॥
सजळजळदघना ॥ सनदकोटीसूर्यकिरणा ॥ मुक्ताहारजडितरत्ना ॥ इरीटमुगुटविराजित ॥५॥
नीलोत्पलनीलवर्णा ॥ श्यामसुंदरामूर्तिघना ॥ स्तवितासहस्त्रवदना ॥ नकळेकाही ॥६॥
पाररजतमाचेमेहुडे ॥ पाहतातूनसापडे ॥ नाहीतुसीयापडिपाडे ॥ भूमंडळीदैवत ॥७॥
अनंतब्रह्मांडाधीशा ॥ गुणचवर्णपरेशा ॥ तुवाज्ञानदेवसर्वेशा ॥ आपणाऐसाठेविला ॥८॥
तवनिवृत्तीम्हणेआम्हादीनातारिले ॥ तुवानारायणावरीआदरिले ॥ सोपानतेथेयेणेघडले ॥ काय ॥९॥
नारायणेस्तुतीपरिसिली ॥ चित्तदेउनीआरक्तबोली ॥ तुम्हीगीतेवरीटीकाकेली ॥ तीमानलीसर्वासी ॥१०॥
नामाम्हणेसकळवैष्णव ॥ जाणूनशुद्धसर्वभाव ॥ संतोषलादेवराव ॥ तूयोगीशिवनिवृत्तिनाथा ॥११॥