अभंग ५८ - मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ ग...
मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ गगनक्रमितगेलाप्रचंडे ॥ वरीआरूढलेप्रचंड ॥ भक्तपुंडलिकासहित ॥१॥
पक्षाचेनिफडत्कार ॥ ग्रामटाकिलेसंवत्सर ॥ पाठारावरीकर्हेतीर ॥ जयजयकारेगर्जिन्नले ॥२॥
त्याकाळीसमारंभकेला ॥ महाउत्सवहरीसीझाला ॥ आनंदगजरप्रवर्तला ॥ दिव्यविमानेमेळाउतरला ॥३॥
दृष्टिदेखावयाकौतुक ॥ शिवगणाआलेसकळिक ॥ कर्ताब्रह्मांडनायक ॥ महिमाअधिकसंतांचा ॥४॥
मुनीपुंडलीक उतरला ॥ संगातीवैष्णवांचामेळा ॥ समाधीसुखाचासोहळा ॥ सकळकळावर्ततसे ॥५॥
हातेखणोनीभूमिका ॥ अमृतशिंपुनीसुगंधिका ॥ ध्वज उभारूनीपताका ॥ गरुडटकाकुंचडोलती ॥६॥
नामाम्हणेसुखसंगती ॥ वैष्णवहरिनामेगर्जती ॥ लक्षुनीनारायणप्रीती ॥ उतरोनीक्षितीसमाधी ॥७॥