अभंग ४८ - नित्य अनुष्ठानयातीर्थी ॥...
नित्य अनुष्ठानयातीर्थी ॥ त्यांचेपूर्वज उद्धरती ॥ जेकाअन्नदानकरिती ॥ तेपावतीवैकुंठी ॥१॥
ऐसेतीर्थक्षेत्रसर्वोत्तम ॥ आणिकनाहीगायासीसम ॥ आदिविष्णुपरब्रह्म ॥ मूळपीठ ॥२॥
नवर्णवेयेथींचीथोरी ॥ प्रत्यक्षयेउनीश्रीहरी ॥ ज्ञानदेवकीर्तनगजरी ॥ समाधीभीतरीसुखरूप ॥३॥
अनंतपुण्यज्याचेगाठी ॥ तरीचज्ञानदेवपडेदिठी ॥ जोडेतपकोट्यानकोटी ॥ ऐसेधूर्जटीबोलिले ॥४॥
हेचिमहासिद्धाचेस्थळ ॥ शंकराचेमूळपीठनिर्मळ ॥ वासकेलियासर्वकाळ ॥ जालेनिर्मळदोषसर्व ॥५॥
अजानवृक्षातळीहरिकथा ॥ नित्यनरकरीजोतत्वता ॥ तोनजाययमपंथेसर्वथा ॥ ऐसेजगन्नाथबोलिले ॥६॥
द्वारीसुवर्ण अश्वत्थ ॥ नित्यपूजलियास्वस्थ ॥ लक्ष्मीनसांडीतयासकळ ॥ आर्तपुण्यहोती ॥७॥
नित्यप्रदक्षिणेपुण्यजोडेपवित्र ॥ पुण्येपूर्वजउद्धरत ॥ बेचाळीससहिता ॥ वैकुंठप्राप्ततयासी ॥८॥
नित्यविष्णूचेपूजन ॥ नित्यनामसंकीर्तन ॥ नित्यवैष्णवसंतभोजन ॥ धन्यपावनइहलोकी ॥९॥
नामाम्हणेअळंकापुर ॥ सर्वक्षेत्रामाजीमनोहर ॥ परमपवित्रमहापवित्र ॥ शैवशास्त्रप्रसिद्धअसे ॥१०॥