अभंग ६२ - पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सा...
पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सांगीतलीसेअवधारी ॥ मगशेषाद्रीपर्वतावरी ॥ गरुडशिखरीउभाअसे ॥१॥
धन्यधन्यहासोपान ॥ धन्यसमाधीसंपूर्ण ॥ प्रत्यक्षयेउनीनारायण ॥ अभयदानदीधलेसे ॥२॥
अनंतवैष्णवप्रेमळ ॥ दिंडीपताकाटाळघोळ ॥ रामकृष्णनामसरळ ॥ भक्तसर्वकाळनाचती ॥३॥
दिव्यविमान उतरले ॥ देववर्षतीसुमने ॥ इंद्रचंद्रदेवगण ॥ लोटांगणेघालिती ॥४॥
समाधिसुखाचाआनंद ॥ आंगेकरीतसेगोविंद ॥ कथासांगितलीअभेद ॥ श्रोतेसन्निधसकळी ॥५॥
म्हणतीधन्यहासोपान ॥ दैवीपुरुषचतुरानन ॥ संतमहंतवैष्णवप्रमाण ॥ रामकृष्णगाताती ॥६॥
नामाम्हणेदेवराव ॥ मनोरथपूर्णकरूनसर्व ॥ अपारगुणकीर्तिलाघव ॥ नकळेमावकोणासी ॥७॥