Get it on Google Play
Download on the App Store

अभंग ६१ - सोपानम्हणेदेवोत्तमा ॥ पू...

सोपानम्हणेदेवोत्तमा ॥ पूर्वीयेथेहोताब्रह्मा ॥ आणितुम्हीसर्वोत्तमा ॥ कोणेस्थळीहोतादेवा ॥१॥

देवम्हणेकथापरिस ॥ कोट्यानुकोटीयुगास ॥ आम्हीहोतोपंढरीस ॥ अनंतकल्पेंगेली ॥२॥

अनंतभक्तांचियामेळी ॥ अनंतवैष्णवभूमंडळी ॥ माजीगवसलेसकळी ॥ केलीआगळीपुंडलीके ॥३॥

येणेप्रसन्नकेलेशंकरा ॥ शंकरेदाखविलेनिर्धारा ॥ आपणराहूनपाठमोरा ॥ जगदुद्धाराकीर्तनी ॥४॥

भक्तिचेनिआराधन ॥ साधियेलेबहुपुण्य ॥ माझेझालेसेयेणे ॥ एककारणपुंडलिकाचे ॥५॥

पूर्वापंढरीसी ॥ होतीविष्णुमात ऐसी ॥ निर्धारकरोनीमानसी ॥ अहर्निशीअनुष्ठान ॥६॥

येथूनपूर्वभागीपंढरी ॥ पश्चिमभागीब्रह्माअवधारी ॥ झालाअवतारकरेपाठारी ॥ महादेवशिखरीमानदेती ॥७॥

तेतीसकोटीदेवस्थळी ॥ पूर्वपश्चिमवश्यमंडळी ॥ उग्रतपसाधिलेचंद्रमौळी ॥ याइंद्रनीळपर्वतावरी ॥८॥

द्रोणाचळ इंद्राचळ ॥ हनुमंतेआणिलाविशाळ ॥ त्याच्याशाखाअधोमूळ ॥ तोहाइंद्रनीळपर्वत ॥९॥

येथेवल्लीसुवर्णाकार ॥ गुप्त अतीनिर्धार ॥ दिसे अस्तमानीअंधार ॥ दीप अकराजगाप्रती ॥१०॥

येथूनियादक्षिणद्वार ॥ गोकर्णमहाबळेश्वरपाठार ॥ पाताळद्वारीपूजाशंकर ॥ बेलपत्रेअद्यापिनिघती ॥११॥

नामाम्हणेदेवाधिदेव ॥ सांगीतलास्वानुभव ॥ अधिष्ठानगुढाव ॥ सोपानदेवनिवांत ॥१२॥

ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2

सरस्वती
Chapters
अभंग ३४ - नानागंधेतुळसीमाळा ॥ वैष्... अभंग ३५ - सर्वतीर्थेमिळालीअनंते ॥ ... अभंग ३६ - ऐसेपांडुरंगबोलिले ॥ मगसक... अभंग ३७ - मगअष्टदिशाव्यापुनी ॥ तीर... अभंग ३८ - मगव्यासपूजासारिली ॥ तैसी... अभंग ३९ - ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपा... अभंग ४० - गगनपंथेशुभ्रविमाने ॥ देव... अभंग ४१ - ऐसेसंतोषलेदेव ॥ प्रसन्नर... अभंग ४२ - चतुर्भुजश्याममूर्ती ॥ शं... अभंग ४३ - ऐसेअळंकापुरीचे ॥ भक्तनां... अभंग ४४ - नमनस्तोत्रप्रारंभः ॥ नमो... अभंग ४५ - ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले ... अभंग ४६ - बैसोनीअंतरिक्षविमानी ॥ स... अभंग ४७ - ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणि... अभंग ४८ - नित्य अनुष्ठानयातीर्थी ॥... अभंग ४९ - ऐसेतीर्थसर्वोत्तम ॥ सांग... अभंग ५० - परब्रह्मपरमूर्ती ॥ परंधा... अभंग ५१ - म्हणेविठोजीशंकराचा ॥ प्र... अभंग ५२ - ऐकोनिनिवृत्तिस्थिरावला ॥... अभंग ५३ - सत्यसत्यजनार्दन ॥ सत्यसत... अभंग ५४ - भक्तपुंडरीकपुढारला ॥ करज... अभंग ५५ - मगसारूनसंध्यास्नान ॥ देव... अभंग ५६ - मगविनवीज्ञानदेव ॥ सकळांच... अभंग ५७ - उगवलादिनप्रभात ॥ स्नानसं... अभंग ५८ - मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ ग... अभंग ५९ - भक्तासमागमेहरी ॥ सत्वराआल... अभंग ६० - ऐसासोपानसंबोखिला ॥ महोत्... अभंग ६१ - सोपानम्हणेदेवोत्तमा ॥ पू... अभंग ६२ - पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सा... अभंग ६३ - सोपानसमाधीबैसला ॥ सकळीपु... अभंग ६४ - नामयाचाधरूनिहात ॥ क्षणाक... अभंग ६५ - भगवंतम्हणेनामयासी ॥ तूयथ...