अभंग ४९ - ऐसेतीर्थसर्वोत्तम ॥ सांग...
ऐसेतीर्थसर्वोत्तम ॥ सांगतसेपुरुषोत्तम ॥ शंकरादिपरमधाम ॥ ब्रह्मनामवर्णित ॥१॥
क्षेत्रमहिमाअत्यद्भुत ॥ आदिसिद्धेश्वरकुळदैवत ॥ समर्थमहाभागवत ॥ नामगर्जतसर्वकाळ ॥२॥
म्हणेपुंडलिकपूर्वीचेस्थळ ॥ आणिशिवाचेमूळपीठनिर्मळ ॥ येथेनिर्विकल्पसकळ ॥ तपविशाळजोडिले ॥३॥
क्षेत्रपंढरीहून अधिक ॥ ऐसेबोलतीब्रह्मादिक ॥ म्हणतीधन्येथिचेलोक ॥ शुद्धभाविकप्रेमळ ॥४॥
घडेमहाविष्णुचेपूजन ॥ तीर्थव्रतसंध्यास्नान ॥ वाचेहरिनामकीर्तन ॥ श्रवणीगुणविष्णूचे ॥५॥
विठोजीम्हणेऐकभक्ता ॥ तपोनिधीमहंततूसर्वथा ॥ ज्ञानदेवासारिखावक्ता ॥ मजआवडतानदिसे ॥६॥
तुम्हीदोघेअसेयासृष्टी ॥ जगउद्धारीपाठीपोटी ॥ कीर्तनकरिताउठाउठी ॥ तोवैकुंठीपावेल ॥७॥
पुंडलीक उठवीसत्वरी ॥ चरणरजवंदिलेशिरी ॥ म्हणेमीभाग्याचाउजरी ॥ तूकैवारीआमुचा ॥८॥
नामाम्हणेदेवभक्त ॥ एकऋषीहोउनीसमस्त ॥ निवृत्तीराजस्तुतीबोलत ॥ प्रेम अद्भुतदाटले ॥९॥