Get it on Google Play
Download on the App Store

पाळणा - गुणी बाळ असा जागसि कां रे...

गुणी बाळ असा जागसि कां रे वांया । नीज रे नीज शिवराया

अपरात्री प्रहर लोटला बाई । तरि डोळा लागत नाहीं ॥

हा चालतसे चाळा एकच असला । तिळ उसंत नाहीं जिवाला ॥

निजवायाचा हरला सर्व उपाय । जागाच तरी शिवराय ॥

चालेल जागता चटका

हा असाच घटका घटका

कुरवाळा किंवा हटका

कां कष्‍टविसी तुझी सांवळी काया । नीज रे नीज शिवराया ॥१॥

ही शांत निजे बारा मावळ थेट । शिवनेरी जुन्नर पेठ ॥

त्या निजल्या ना तशाच घाटाखालीं । कोंकणच्या चवदा ताली ॥

ये भिववाया बागुल तो बघ बाळा । किति बाई काळा काळा ॥

इकडे हे सिद्दि-जवान

तो तिकडे अफझुलखान

पलिकडे मुलुख मैदान

हे आले रे तुजला बाळ धराया । नीज रे नीज शिवराया ॥२॥

पाळणे

स्तोत्रे
Chapters
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म... गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । प... विष्णूचा पाळणा शिवाचा पाळणा परशुरामाचा पाळणा रामाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... रामाचा पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ... लवकुशाचा पाळणा कृष्णाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... कृष्णाचा पाळणा - मथुरेमध्ये अवतार धरिला । ... दत्ताचा पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।... दत्ताचा पाळणा - जो जो जो रे जो जो जो । तू... मदालसाचे अंगाई गीत शिवाजीचा पाळणा - तुज जोजविते माय जिजाई बाळ... शिवाजीचा पाळणा - मी लोटिते झोका तुज शिवबाळ... रजनीमाईचा पाळणा शाहूचा पाळणा पांडुरंगाचा पाळणा बाळाचा पाळणा बाळाराजाचा पाळणा वनदेवीचा पाळणा आजीबाईचा जुना पाळणा निर्गुणाचा पाळणा बागुलबावा आला अक्रूराचा पाळणा जोग्याचा पाळणा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म... पाळणा - जो जो जो जो रे गजवदना ॥ प... पाळणा - जो जो जो :जो रे कुळभुषणा ... पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ... पाळणा - जो जो रे जो जो श्रीरामचंद... पाळणा - जो जो जो जो रे जो जो जो ।... पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।... पाळणा - जो जो जो जो रे सुखधामा । ... पाळणा - जो जो जो जो रे व्यापका । ... पाळणा - जो जो जो जो रे त्रिनयना ।... पाळणा - जो जो जो जो रे घनश्यामा ।... पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... पाळणा - मथुरेमध्यें अवतार धरिला ॥... पाळणा - जो जो रे जो जो श्रीकृष्ण ... पाळणा - जो जो जो बाळा नको रडूं गो... पाळणा पाळणा - जो जो जो जा रे मधुसुदना ।... पाळणा - सुतार निर्गुणिचे तुजसाठीं... पाळणा - धरतीच्या बाळा जो जो रे ... पाळणा - हळु हालवितें पाळण्याला ... पाळणा - गुणी बाळ असा जागसि कां रे... पाळणा - जो जो जो जो रे । शिवराया ... पाळणा - सन अठराशें सत्याण्णव साला...