Android app on Google Play

 

कृष्णाचा पाळणा - मथुरेमध्ये अवतार धरिला । ...

 

मथुरेमध्ये अवतार धरिला । कृष्ण देवकीच्या गर्भासी आला ।

तोडून बेड्या बंद सोडिला । चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला ॥

जो बाळा जो ॥१॥

गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला । नंदाच्या घरी आनंद झाला ।

गुढ्या तोरणॆ शिखरी बांधिती । कुसुमांचे हार देव वर्षती ॥

जो बाळा जो ॥२॥

तिसर्‍या दिवशी वाजे वाजंत्री । तासे नौबती उत्सव करिती ।

सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द । त्याचे छंदाने नाचे गोविंद ॥

जो बाळा जो ॥३॥

चवथ्या दिवशी चौकी । बाळबाळंतिणीची न्हाणी होती ।

निंबे डाळिंबे नारळ आणिती । सख्या मिळोनी दृष्ट काढिती ॥

जो बाळा जो ॥४॥

पाचव्या दिवशी पाटापूजन । बांधिला फुलवरा वाक्या तोरण ।

सरी बिंदली आंगडे पैरण । खिरी भरल्या ताटे ठेविली वाढून ॥

जो बाळा जो ॥५॥

सहाव्या दिवशी सटवी पूजन । हळदीकुंकवाची देताती वाणं ।

एकमेकीसी सखया होऊन । पानसुपार्‍या खोबरे वाटून ॥

जो बाळा जो ॥६॥

सातव्या दिवशी सटवीचा फेरा । गोपां बाळंतीण आवरुन धरा ।

सांजच्या प्रहरी अंगारा करा । गाई वासरा मुला लेकरा ॥

जो बाळा जो ॥७॥

आठव्या दिवशी आठवी चौकी । गोपा बाळंतीण नवतीस न्हाती ।

सखया मिळोनी जागरण करिती । कृष्णाच्या लीला आनंदे गाती ॥

जो बाळा जो ॥८॥

नवव्या दिवशी नवस केला । खेळणॆ वाहीन तुजला ।

रत्‍नजडीत पालख सजला । वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला ॥

जो बाळा जो ॥९॥

दहाव्या दिवशी दहावी चौकी । न्हाणी बोळवून सारवल्या भिंती ।

मूठभरल्या ओट्या दिधल्या लावूनी । देव स्वर्गीचे पुष्पे वर्षूनी ॥

जो बाळा जो ॥१०॥

अकराव्या दिवशी अकरावी चौकी । यशोदा बसली मंचकावरती ।

नयनाच्या कोरी काजळ भरी । वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी ॥

जो बाळा जो ॥११॥

बाराव्या दिवशी बारसे येती । परोपरी पक्कान्ने समये करिती ।

लाडू मोदक पंखा वारिती । खीर भरल्या वाट्या साखर मिळविती ॥

जो बाळा जो ॥१२॥

तेराव्या दिवशी तेरावी चौकी । बारीक जुने नेसूनि येती ।

मोर गर्जती चौखंडा वरती । गाई वासरे मोदे हंबरती ॥

जो बाळा जो ॥१३॥

चवदाव्या दिवशी चवदावी चौकी । नंदी महादेव परतुनी येती ।

बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती । गोपांचे मीठ बळीराम घेती ॥

जो बाळा जो ॥१४॥

पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी । नगरीच्या नारी मिळुनी येती ।

पाळण्यामध्ये देव मुरारी । नाव ठेविले श्रीकृष्ण हरी ॥

जो बाळा जो ॥१५॥

सोळाव्या दिवशी सोहळा केला । गोपी गवळणीने कृष्ण आळवीला ।

त्यांच्या हृदयी आनंद झाला । एका जनार्दनी पाळणा गाईला ॥

जो बाळा जो ॥१६॥

 

पाळणे

स्तोत्रे
Chapters
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म...
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । प...
विष्णूचा पाळणा
शिवाचा पाळणा
परशुरामाचा पाळणा
रामाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ...
रामाचा पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ...
लवकुशाचा पाळणा
कृष्णाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ...
कृष्णाचा पाळणा - मथुरेमध्ये अवतार धरिला । ...
दत्ताचा पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।...
दत्ताचा पाळणा - जो जो जो रे जो जो जो । तू...
मदालसाचे अंगाई गीत
शिवाजीचा पाळणा - तुज जोजविते माय जिजाई बाळ...
शिवाजीचा पाळणा - मी लोटिते झोका तुज शिवबाळ...
रजनीमाईचा पाळणा
शाहूचा पाळणा
पांडुरंगाचा पाळणा
बाळाचा पाळणा
बाळाराजाचा पाळणा
वनदेवीचा पाळणा
आजीबाईचा जुना पाळणा
निर्गुणाचा पाळणा
बागुलबावा आला
अक्रूराचा पाळणा
जोग्याचा पाळणा
पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म...
पाळणा - जो जो जो जो रे गजवदना ॥ प...
पाळणा - जो जो जो :जो रे कुळभुषणा ...
पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ...
पाळणा - जो जो रे जो जो श्रीरामचंद...
पाळणा - जो जो जो जो रे जो जो जो ।...
पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।...
पाळणा - जो जो जो जो रे सुखधामा । ...
पाळणा - जो जो जो जो रे व्यापका । ...
पाळणा - जो जो जो जो रे त्रिनयना ।...
पाळणा - जो जो जो जो रे घनश्यामा ।...
पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ...
पाळणा - मथुरेमध्यें अवतार धरिला ॥...
पाळणा - जो जो रे जो जो श्रीकृष्ण ...
पाळणा - जो जो जो बाळा नको रडूं गो...
पाळणा
पाळणा - जो जो जो जा रे मधुसुदना ।...
पाळणा - सुतार निर्गुणिचे तुजसाठीं...
पाळणा - धरतीच्या बाळा जो जो रे ...
पाळणा - हळु हालवितें पाळण्याला ...
पाळणा - गुणी बाळ असा जागसि कां रे...
पाळणा - जो जो जो जो रे । शिवराया ...
पाळणा - सन अठराशें सत्याण्णव साला...